Marathi News> Lifestyle
Advertisement

सकाळच्या नाश्त्याला बनवा झटपट आणि हेल्दी मूग डाळीची टिक्की, जाणून घ्या Recipe

Moong Dal Tikki Recipe: कमी तेलात शॅलो फ्राय करून तयार होणारी ही टिक्की स्वाद आणि आरोग्याचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे.  

सकाळच्या नाश्त्याला बनवा झटपट आणि हेल्दी मूग डाळीची टिक्की, जाणून घ्या Recipe

How to Make Moong Dal Tikki: सकाळच्या नाश्त्याला झटपट आणि हेल्दी असं काही तरी खावंसं वाटतं. अशावेळी काय बनवायचं हे समजत नाही. जर तुम्हाला काहीतरी पौष्टिक, हलकं आणि टेस्टी खायचं असेल, तर आम्ही एक उत्तम पर्याय घेऊन आलो आहोत. सकाळच्या नाश्त्यासाठी मूगडाळ टिक्की हा एक परफेक्ट पर्याय आहे. ही टिक्की फक्त खमंगच नाही तर प्रोटीनने भरलेली आहे. ही टिक्की जी तुम्ही सकाळच्या-संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, पाहुण्यांसाठी किंवा अगदी टिफिनमध्येही देऊ शकता. कमी तेलात शॅलो फ्राय करून तयार होणारी ही टिक्की स्वाद आणि आरोग्याचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. चला तर मग, जाणून घेऊया ही सोपी पण चविष्ट मूगडाळ टिक्की कशी बनवायची... 

मूगडाळ टिक्कीसाठी लागणारे साहित्य (Ingredients) 

मूग डाळ  – १ कप (रात्री भिजवून दुसऱ्या दिवशी सगळं पाणी काढून)

बटाटे – २ मध्यम आकाराचे (उकडून मॅश केलेले)

हिरवी मिरची – २ बारीक चिरलेली

आले – १ इंच तुकडा (किसलेला)

हे ही वाचा: थंडगार पावसाळी वातावरणात बनवा स्वादिष्ट वरणफळ! जाणून घ्या मराठमोळी Recipe

 

हळद – १/२ टीस्पून

धणे पूड – १ टीस्पून

जिरे पूड – १/२ टीस्पून

गरम मसाला – १/२ टीस्पून

कोथिंबीर – २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)

मीठ – चवीनुसार

ब्रेडक्रंब्स / रवा – १/२ कप (टिक्कीला कुरकुरीत करण्यासाठी)

तेल – शॅलो फ्रायसाठी

हे ही वाचा: Spring Roll: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा स्प्रिंग रोल! जाणून घ्या रेस्टॉरंट-स्टाईल Recipe

 

कशी बनवायची मूग डाळ टिक्की? (Steps)

भिजवलेली मूगडाळ मिक्सरमध्ये कमी पाणी घालून थोडी जाडसर वाटून घ्या.

एका मोठ्या बाऊलमध्ये वाटलेली डाळ, मॅश केलेले बटाटे, हिरवी मिरची, आले, हळद, धणे पूड, जिरे पूड, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर घालून सर्व नीट मिक्स करा.

मिश्रण थोडं घट्ट वाटत असेल, तर थोडे ब्रेडक्रंब्स किंवा थोडासा रवा घालू शकता. आता या मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करून हाताने दाबून टिक्कीसारखा आकार द्या.

हे ही वाचा: नाश्त्यासाठी बनवा अस्सल मुंबई स्टाइल मसाला सॅंडविच, जाणून घ्या सोपी Recipe

तवा गरम करून त्यावर थोडं तेल घाला. टिक्की दोन्ही बाजूंनी सोनेरी कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवर शॅलो फ्राय करा.

गरमागरम टिक्की  चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.

Read More