Marathi News> Lifestyle
Advertisement

सकाळच्या गडबडीत नाश्त्यासाठी बनवा झटपट होणार ब्रेड उपमा, नोट करा Recipe

Bread Upma Recipe Recipe:  लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा नाश्ता सगळ्यांनाच आवडतो. अगदी 10-15 मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी टिफिनसाठीही उत्तम पर्याय आहे. 

सकाळच्या गडबडीत नाश्त्यासाठी बनवा झटपट होणार ब्रेड उपमा, नोट करा Recipe

How to Make Bread Upma Recipe: ब्रेड उपमा ही एक झटपट तयार होणारी आणि कमी साहित्यात होणारी नाश्त्याची रेसिपी (Breakfast Recipe) आहे. विशेषतः जेव्हा वेळ कमी असतो आणि नाश्त्याला काही झटपट हवं असतं, तेव्हा ब्रेड उपमा ही एकदम परफेक्ट  ठरतो. ही रेसिपी पारंपरिक उपमाला दिलेली एक स्वादिष्ट ट्विस्ट आहे. यामध्ये पोह्यांऐवजी ब्रेडचे तुकडे वापरले जातात. कांदा, टोमॅटो, मसाले आणि कोथिंबीर यांची चव ब्रेडसोबत मिसळून टेस्टी नाश्ता तयार होतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा नाश्ता सगळ्यांनाच आवडतो. अगदी 10-15 मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी टिफिनसाठीही उत्तम पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊया ही झटपट आणि चविष्ट ब्रेड उपम्याची रेसिपी... 

लागणारे साहित्य (2–3 व्यक्तींकरिता):

  • ब्रेड स्लाइसेस – 6 ते 8 
  • कांदा – 1 मध्यम (चिरलेला)
  • टोमॅटो – 1 मध्यम (चिरलेला)
  • हिरव्या मिरच्या – 1-2 (चिरलेल्या)
  • आले – 1 चमचा (किसलेलं)
  • मोहरी – 1/2 चमचा
  • हळद – 1/4 चमचा
  • कढीपत्ता – 7-8 पाने
  • हिंग – एक चिमूटभर
  • कोथिंबीर – 1 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • साखर – 1/2 चमचा (ऐच्छिक)
  • लिंबू रस – 1 चमचा (अंतिम टप्प्यात)
  • तेल – 2 टेबलस्पून

कसा बनवायचा ब्रेड उपमा?

  • ब्रेडचे छोटे चौकोनी तुकडे करून बाजूला ठेवा. ब्रेड शक्यतो थोडासा शिळा ब्रेड वापरल्यास अजून छान टेस्ट येते. 
  • आता कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घाला. नंतर आले, कांदा घालून छान परता.
  • टोमॅटो आणि हळद घालून मिक्स करा. २ मिनिटे झाकून शिजवा.
  • आता ब्रेडचे तुकडे घालून चांगले परतून घ्या. सर्व तुकड्यांना मसाला लागेल असं पहा.
  • वरून कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.
  • चहा किंवा दह्यासोबत ब्रेड उपमा अतिशय छान लागतो.
Read More