How to Make Besan Gatte ki Sabji: बेसनाचे गट्टे ही एक पारंपरिक आणि लोकप्रिय राजस्थानी डिश आहे, जी आता संपूर्ण भारतात आवडीने खाल्ली जाते. मसालेदार बेसनापासून तयार झालेले गट्टे आधी उकळून मग चविष्ट ग्रेव्हीत शिजवले जातात. चपाती, भाकरी किंवा गरमागरम भातासोबत ही भाजी फारच टेस्टी लागते. खास गोष्ट म्हणजे या भाजीचा स्वाद आणि टेक्स्चर इतका भरदार असतो की एकदा खाल्लं की पुन्हा-पुन्हा खाण्याची इच्छा होते. कमी साहित्य आणि थोड्याशा वेळात तयार होणारी ही रेसिपी रोजच्या जेवणात थोडा बदल हवा असेल, तर नक्की करून पाहा. चला जाणून घेऊयात सोपी रेसिपी...
बेसन – 1 कप
हळद – ¼ टीस्पून
लाल तिखट – ½ टीस्पून
धणे-जिरे पूड – ½ टीस्पून
ओवा – ¼ टीस्पून
हिंग – 1 चिमूट
मीठ – चवीनुसार
तेल – 1 टेबलस्पून
पाणी – गूळसर मळण्यासाठी
तेल – 2 टेबलस्पून
मोहरी – ½ टीस्पून
जिरे – ½ टीस्पून
हिंग – 1 चिमूट
कांदा – 1 मध्यम (बारीक चिरून)
टोमॅटो – 1 मध्यम (बारीक चिरून)
आलं-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
हळद – ¼ टीस्पून
लाल तिखट – 1 टीस्पून
धणे-जिरे पूड – 1 टीस्पून
गरम मसाला – ½ टीस्पून
दही – 2 टेबलस्पून
मीठ – चवीनुसार
पाणी – आवश्यकतेनुसार
कोथिंबीर – सजावटीसाठी
एका मोठ्या भांड्यात बेसन, हळद, तिखट, धणे-जिरे पूड, ओवा, हिंग, मीठ आणि तेल टाका.
थोडंसं पाणी घालून घट्टसर पीठ मळा.
त्या पिठाचे 2-3 लांबट गट्टे (उंडे) बनवा.
एका पातेल्यात पाणी गरम करा आणि त्यात हे गट्टे 8-10 मिनिटं उकळा.
शिजल्यानंतर गट्टे थोडे गार झाले की त्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करा.
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग टाका.
मग त्यात कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.
त्यात आलं-लसूण पेस्ट टाका आणि 1-2 मिनिटं परता.
आता टोमॅटो, हळद, तिखट, धणे-जिरे पूड घालून मिक्स करा.
टोमॅटो नरम झाले की दही हळूहळू घालून सतत ढवळत राहा, दही फुटणार नाही याची काळजी घ्या.
2-3 मिनिटं शिजवून त्यात पाणी आणि मीठ घाला (पातळसर ग्रेव्ही हवी असल्यास थोडं जास्त पाणी).
उकळी आली की त्यात गट्ट्याचे तुकडे घाला आणि 5 मिनिटं मंद आचेवर शिजवा.
शेवटी गरम मसाला आणि कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
गरमागरम पोळी, फुलका, तांदळाचा भात किंवा बाजरीची भाकरी यासोबत ही भाजी जबरदस्त लागते.
दही ऐवजी तुम्ही थोडं काजू पेस्ट किंवा क्रीम वापरून रिच ग्रेव्ही बनवू शकता.