How to Make Egg Biryani: आठवड्याभर नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो. अशावेळी विकेंडला काहीतरी नवीन हवं असत. या शनिवार-रविवारी तुम्ही नॉनव्हेज रेसिपीसुद्धा बनवू शकता. आज आपण बनवणार आहोत अशी रेसिपी जी अंड्याच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरेल. झणझणीत, मसालेदार आणि परफेक्ट रविवारची स्पेशल अंडा बिर्याणी. तुमचं काहीतरी हटके आणि चविष्ट खायचं मन असेल, तर ही अंडा बिर्याणीची रेसिपी नक्की करून बघा. घरच्या घरी हॉटेलसारखा स्वाद मिळतो. प्रोटीनने भरपूर आणि मसाल्यांनी सजलेली अंडा बिर्याणीची रेसिपी ही एकदम खास आहे. शाकाहारी आणि मांसाहारी यांच्या मधे असलेली परफेक्ट डिश म्हणजे अंडा बिर्याणी! आज आपण तीच डिश झटपट आणि सोप्या पद्धतीनं कशी बनवायची ते जाणून घेणार आहोत.
बासमती तांदूळ – 1½ कप (30 मिनिटं भिजवलेले)
पाणी – 5 कप
तमालपत्र – 1
लवंग – 3
दालचिनी – 1 छोटा तुकडा
हिरवे वेलदोडे – 2
मीठ – चवीनुसार
उकडलेली अंडी – 4 ते 5
कांदे – 2 मोठे (बारीक चिरून किंवा तळलेले)
टोमॅटो – 1 मध्यम (बारीक चिरलेला)
हिरवी मिरची – 2 (चिरून)
आलं-लसूण पेस्ट – 1½ टेबलस्पून
दही – ½ कप
बिर्याणी मसाला – 1 टेबलस्पून
लाल तिखट – 1 टीस्पून
हळद – ¼ टीस्पून
गरम मसाला – ½ टीस्पून
मीठ – चवीनुसार
तेल – 3 टेबलस्पून
तूप – 1 टेबलस्पून
कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने – सजावटीसाठी
मोठ्या भांड्यात पाणी उकळा. त्यात तमालपत्र, दालचिनी, लवंग, वेलदोडे, मीठ आणि तांदूळ टाका.
तांदूळ 80% शिजवून घ्या आणि गाळून बाजूला ठेवा.
कढईत तेल गरम करून कांदे गुलाबी आणि कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या.
त्यात आलं-लसूण पेस्ट टाकून परता.
नंतर हिरवी मिरची आणि टोमॅटो टाका. तेल सुटेपर्यंत परतवा.
दही, हळद, तिखट, बिर्याणी मसाला, गरम मसाला टाकून नीट मिसळा.
उकडलेल्या अंड्यांना काट्याने छिद्र करा आणि त्या या मसाल्यात घालून 4-5 मिनिटं चांगल्या प्रकारे शिजवा.
एका मोठ्या भांड्यात अर्धा भात पसरवा.
त्यावर अंड्याचा मसाला पसरवा.
उरलेला भात घाला, थोडं तूप, कोथिंबीर, पुदिना शिंपडा.
झाकण ठेवून 10-15 मिनिटं धीम्या आचेवर ‘दम’ वर ठेवा.
गरमागरम अंडा बिर्याणी रायता, कोशिंबीर आणि लोणच्यासोबत सर्व्ह करा.
जास्त तिखट हवी असल्यास लाल तिखट किंवा मिरची पूड वाढवा.
व्हेज बिर्याणीमध्ये अंडी घालून हेच मिश्रण वापरू शकता.