Marathi News> Lifestyle
Advertisement

डिनरसाठी बनवा रेस्टॉरंट-स्टाईल पनीर बटर मसाला, Recipe आहे सोपी

Paneer Butter Masala Recipe: चला तर मग, आजच्या विकेंडला बनवूया रेस्टॉरंट-स्टाईल पनीर बटर मसाला, तीही अगदी घरच्या घरी. जाणून घ्या सोपी रेसिपी 

डिनरसाठी बनवा रेस्टॉरंट-स्टाईल पनीर बटर मसाला, Recipe आहे सोपी

How to make restaurant-style paneer butter masala: रविवारची संध्याकाळ म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा आणि नेहेमीच्या जेवणापेक्षा खास जेवणाचा आनंद लुटण्याचा क्षण असतो. आठवड्याभर एकाच पद्धतीचं जेवण जेवल्यावर विकेंडला काही तरी छान खावंसं वाटतं. रविवारी साध्या रोजच्या जेवणापेक्षा काहीतरी स्पेशल असावं असं वाटतं ना? मग अशावेळी तुम्ही जेवणासाठी पनीर बटर मसाला बनवू शकता. मसाल्याच्या सुगंधाने भरलेली,ही टेस्टी डिश प्रत्येक वयाच्या व्यक्तीला आवडणारी आहे. नान, पराठा किंवा  भातासोबत ही भाजी फारच टेस्टी लागते. चला तर मग, आजच्या विकेंडला बनवूया रेस्टॉरंट-स्टाईल पनीर बटर मसाला, तीही अगदी घरच्या घरी. जाणून घ्या सोपी रेसिपी.... 

पनीर बटर मसाला (4 जणांसाठी) लागणारे साहित्य

पनीर – 250 ग्रॅम (चौरस तुकडे करून)

बटर – 2 टेबलस्पून

तेल – 1 टेबलस्पून

कांदा – 2 मध्यम (स्लाइस करून)

टोमॅटो – 3 मध्यम (बारीक चिरून)

काजू – 10-12

आलं-लसूण पेस्ट – 1 टेबलस्पून

दूध – ½ कप

पाणी – ½ कप (गरजेनुसार)

साखर – ½ टीस्पून (ऑप्शनल)

लागणारे मसाले

लाल तिखट – 1 टीस्पून

गरम मसाला – ½ टीस्पून

धणेपूड – 1 टीस्पून

हळद – ¼ टीस्पून

मीठ – चवीनुसार

कसूरी मेथी – 1 टीस्पून (क्रश करून)

क्रीम – 2 टेबलस्पून (ऑप्शनल)

कसं बनवायचं पनीर बटर मसाला?

1. पेस्ट तयार करा

एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करा.

त्यात कांदा, काजू, आणि थोडं मीठ टाका.

कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.

मग त्यात चिरलेले टोमॅटो आणि थोडं पाणी टाकून 5-6 मिनिटं शिजवा.

थंड झाल्यावर मिक्सरमध्ये गारसर पेस्ट बनवा.

2. ग्रेवी तयार करा

दुसऱ्या कढईत बटर गरम करा.

त्यात आलं-लसूण पेस्ट घालून 1 मिनिट परतून घ्या.

त्यात बनवलेली पेस्ट टाका.

हळद, लाल तिखट, धणेपूड घालून 5-6 मिनिटं परतून घ्या.

3. फायनल टच 

पेस्ट शिजल्यावर त्यात दूध, पाणी, साखर आणि मीठ घालून एकसंध शिजवा.

त्यात पनीरचे तुकडे टाका आणि 4-5 मिनिटं मध्यम आचेवर शिजवा.

गरम मसाला, कसूरी मेथी आणि क्रीम घालून मिक्स करा.

वरून थोडं बटर टाकून झाकण ठेवून 2 मिनिटं दम द्या. अशाप्रकारे पनीर बटर मसाला तयार आहे. 

वरून कोथिंबीर घालून सजवा.

पनीर बटर मसाला गरम गरम नान, बटर पराठा किंवा साजूक तुप घालून बनवलेल्या भातासोबत सर्व्ह करा.

Read More