Marathi News> Lifestyle
Advertisement

रात्रीच्या जेवणासाठी बनवा चविष्ट आणि झटपट अशी स्पेशल 'पनीर मखनी', नोट करा Dinner Recipe

Paneer Makhani Recipe: रविवारच्या या पावसाळी रात्री तुम्ही चटपटीत आणि झटपट होणारी पनीर मखनी तुम्ही जेवणासाठी बनवू शकता. चला जाणून घेऊयात सोपी रेसिपी... 

रात्रीच्या जेवणासाठी बनवा चविष्ट आणि  झटपट अशी स्पेशल 'पनीर मखनी', नोट करा Dinner Recipe

How to Make Paneer Makhani Know Recipe: रविवारचा दिवस म्हणजे आराम करण्याचा आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा दिवस. या दिवशी आवर्जून काही तरी टेस्टी आणि नेहमीपेक्षा नवीन अशी डिश बनवली जाते. संपूर्ण आठवड्याच्या धावपळीनंतर रविवारच्या रात्रीच्या जेवणात काही तरी स्पेशल असावं असं सगळ्यांची इच्छा असते. अशा वेळी काहीतरी चविष्ट, रेस्टॉरंट स्टाईल आणि झटपट तयार होणारी रेसिपी हवी असते. तुम्ही रविवारच्या रात्रीच्या जेवणासाठी पनीर मखनी ही शाही डिश बनवू शकतो. ही डिश इतकी टेस्टी असते की एकदा चव घेतली की परत परत खावीशी वाटते. गरम फुलके, पराठा किंवा बटर नानसोबत ही डिश रविवारच्या रात्रीच्या जेवणाला खास बनवते. चला तर मग वेळ न घालवता, जाणून घेऊयात रेस्टॉरंट स्टाईल पनीर मखनी रेसिपी कशी बनवायची...  

लागणारे साहित्य 

  • पनीर – 250 ग्रॅम (चौकोनी तुकडे केलेले)
  • बटर – 2 टेबलस्पून
  • तेल – 1 टेबलस्पून
  • कांदा – 1 मध्यम (बारीक चिरलेला)
  • टोमॅटो – 3 मध्यम (बारीक कापून किंवा पेस्ट बनवून)
  • काजू – 10 ते 12 (15 मिनिटे गरम पाण्यात भिजवून पेस्ट करून घ्या)

हे ही वाचा: नाश्त्याला नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? बनवा फ्युजन स्टाईल चीज मसाला घावन, नोट करा Recipe

 

  • आलं-लसूण पेस्ट – 1 टेबलस्पून
  • लाल तिखट – 1 टीस्पून (कश्मिरी तिखट रंगासाठी)
  • हळद – 1/4 टीस्पून
  • गरम मसाला – 1/2 टीस्पून
  • कसूरी मेथी – 1 टीस्पून (चुरून)
  • साखर – 1/2 टीस्पून (ऐच्छिक)
  • मीठ – चवीनुसार
  • फ्रेश क्रीम – 2 टेबलस्पून

हे ही वाचा: सकाळच्या गडबडीत स्वादिष्ट आणि झटपट नाश्ता हवा आहे? ट्राय करा रवा उपमा, नोट करा Breakfast Recipe

 

कशी बनवायची पनीर मखनी?

  • काजू 10-15 मिनिटे गरम पाण्यात भिजवून मऊ पेस्ट बनवा. टोमॅटोची सुद्धा पेस्ट करून घ्या.
  • थोडंसं बटर आणि तेल गरम करून त्यात पनीरचे तुकडे हलके सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. हे तुकडे बाजूला काढून ठेवा. 
  • त्याच कढईत आणखी थोडं बटर टाका. त्यात आलं-लसूण पेस्ट परतवा. मग बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंग येईपर्यंत परतवा.
  • आता टोमॅटो पेस्ट टाका. त्यात हळद, तिखट, मीठ, साखर घालून व्यवस्थित परता. टोमॅटो तेल सोडत आला की काजू पेस्ट घालून 4-5 मिनिटे शिजवा.

हे ही वाचा: Recipe: नाश्त्यासाठी बनवा रवा-पोह्यांची सॉफ्ट आणि हेल्दी इडली, झटपट तयार होईल Healthy Breakfast

 

  • त्यात थोडं पाणी घालून गरम मसाला आणि कसूरी मेथी टाका. मग परतलेले पनीर टाका आणि 5-7 मिनिटे मध्यम आचेवर शिजवा.
  • शेवटी गॅस बंद करून फ्रेश क्रीम घाला आणि एकवार हलवा. थोडा वेळ झाकण ठेवून गरम गरम सर्व्ह करा.
  • तुम्ही ही भाजी बटर नान, जीरा राईस,  फुलके किंवा चपातीसोबत सर्व्ह करा. 
Read More