Marathi News> Lifestyle
Advertisement

Spring Roll: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा स्प्रिंग रोल! जाणून घ्या रेस्टॉरंट-स्टाईल Recipe

Spring Roll Recipe in Marathi: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा स्पेशल कार्यक्रमासाठी घरीच तुम्ही सहज रेस्टॉरंट-स्टाईल स्प्रिंग रोल तयार करता येतात.   

Spring Roll: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा स्प्रिंग रोल! जाणून घ्या रेस्टॉरंट-स्टाईल Recipe

How to Make Spring Roll: स्प्रिंग रोल ही एक लोकप्रिय चायनीज डिश आहे. भारतातील अस्गडी सगळ्याच भागात आता ही डिश मिळते. कुरकुरीत, चवदार आणि तोंडाला पाणी आणणारा असा हा स्नॅक्स लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच्याच पसंतीस उतरतो. बाहेरून कुरकुरीत आणि आतून भाज्यांनी भरलेले हे रोल्स पार्टीसाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा स्पेशल कार्यक्रमासाठी उत्तम ठरतात. हे रोल्स तुम्ही घरी सहज तयार करू शकता. थोड्याशा साहित्याने आणि थोडा वेळ दिल्यास घरच्या घरीही टेस्टी स्प्रिंग रोल्स बनवता येतात. चला तर मग पाहूया ही सोपी आणि झटपट तयार होणारी स्प्रिंग रोलची रेसिपी... 

लागणारे साहित्य (Ingredients) 

स्टफिंगसाठी:

कोबी – 1 कप (बारीक कापून) 

गाजर – 1 कप (बारीक कापून) 

सिमला मिरची – 1/2 कप (बारीक कापून) 

कांदा – 1 मध्यम (ऐच्छिक)

आले-लसूण पेस्ट – 1 चमचा

सोया सॉस – 1 चमचा

व्हिनेगर – 1/2 चमचा

मिरी पूड – 1/2 चमचा

मीठ – चवीनुसार

तेल – 1 ते 2 चमचे

हे ही वाचा: नाश्त्यासाठी बनवा अस्सल मुंबई स्टाइल मसाला सॅंडविच, जाणून घ्या सोपी Recipe

 

स्प्रिंग रोल शीटसाठी (किंवा रेडीमेड वापरू शकता)

मैदा – 1 कप

मीठ – 1 चिमूट

पाणी – लागेल तितके

तेल – थोडं (तवा ग्रीस करण्यासाठी)

हे ही वाचा: नाश्त्यासाठी बनवा झटपट होणारा पोहे उत्तप्पा, पूर्वतयारीची नाही गरज, जाणून घ्या Recipe

 

तळण्यासाठी:

तेल – आवश्यकतेनुसार

पेस्ट लावण्यासाठी 

मैदा – 1 चमचा

पाणी – 1 चमचा 

जाणून घ्या कृती (Steps):

कढईत तेल गरम करा.

त्यात आले-लसूण पेस्ट घाला व थोडं परता.

नंतर सर्व चिरलेल्या भाज्या घाला आणि मध्यम आचेवर 4–5 मिनिटं परता.

त्यात सोया सॉस, व्हिनेगर, मिरी पूड आणि मीठ घालून नीट मिक्स करा.

हवे असल्यास नूडल्सही घालू शकता. स्टफिंग थंड होऊ द्या.

आता शीट तयार करण्यासाठी मैदा, मीठ आणि पाणी मिसळून पातळसर पीठ तयार करा.

हे ही वाचा: Paneer Bhurji: रात्रीच्या जेवणासाठी बनवा झटपट आणि टेस्टी पनीर भुर्जी, नोट करा सोपी Recipe

तव्यावर पातळसर डोसाप्रमाणे एक शीट घाला. फक्त थोडी शिजवून घ्या. 

सर्व शीट्स तयार करून ठेवा.

प्रत्येक शीटवर थोडं स्टफिंग ठेवा.

बाजूने फोल्ड करा आणि घट्ट रोल करा.

शेवटी मैद्याच्या पेस्टने तो चिकटवून बंद करा.

कढईत तेल गरम करा. तयार स्प्रिंग रोल मध्यम आचेवर कुरकुरीत सोनेरी रंग येईपर्यंत तळा.

गरमागरम स्प्रिंग रोल टोमॅटो सॉस किंवा चायनीज सॉससोबत सर्व्ह करा.

Read More