Marathi News> Lifestyle
Advertisement

Shravan Special Recipe: श्रावणातल्या उपवासासाठी बनवा साबुदाणा लाडू! सोपी आहे Recipe

Sabudana Laddu Recipe: साबुदाणा लाडूची पारंपरिक आणि उपवासास रेसिपी देत आहोत. हे लाडू खूप स्वादिष्ट, पचायला हलके आणि उपवासाच्या दिवशी उत्तम पर्याय असतात.  

Shravan Special Recipe: श्रावणातल्या उपवासासाठी बनवा साबुदाणा लाडू! सोपी आहे Recipe

Shravan 2025 Upvas Special Sabudana Ladoo Recipe in Marathi: उपासाच्या दिवशी काहीतरी पौष्टिक, हलकं आणि गोड खायचं असेल, तर साबुदाणा लाडू हा एक अप्रतिम पर्याय आहे. साबुदाणा आणि त्याला शेंगदाणा, वेलदोड्याचा स्वाद, साजूक तुपाचा सुवास यांची जोड मिळाली की, हे चविष्ट लाडू तयार होतात. हे लाडू मनाला व शरीरालाही तृप्त करत असतात. आता श्रवणात उपवास करताना या लाडूंना फार महत्त्व आहे. हे लाडू बनवायला सोपे, टिकायला चांगले आणि चवीलाही टेस्टी असतात. घरगुती, पारंपरिक आणि उपासास योग्य असा एक उत्तम पर्याय म्हणजे हे साबुदाणा लाडू. चला याची सोपी रेसिपी जाणून घेऊयात... 

लागणारे साहित्य (7-8 लाडूसाठी)

साबुदाणा (स्मॉल साईज) – १ कप

शेंगदाणे – ½ कप

पिठीसाखर / गूळ पूड – ½ कप (चवीनुसार कमी-जास्त करू शकता)

साजूक तूप – ¼ कप (५-६ टेबलस्पून)

वेलदोडा पूड – ¼ टीस्पून

काजू-बदाम (ऐच्छिक) – थोडे तुकडे

कसे बनवायचे लाडू? 

कोरड्या कढईत मध्यम आचेवर साबुदाणा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. (त्याचा रंग बदलतो आणि तो फुटायला लागतो.) नंतर थंड झाल्यावर मिक्सरमध्ये थोडा जाडसर पूड करून घ्या.

शेंगदाणे कुरकुरीत भाजून त्याची साले काढा आणि थोडे जाडसर वाटून घ्या.

तुम्ही साखर वापरत असाल तर ती आधीच पिठीसाखर स्वरूपात ठेवा. गूळ वापरत असाल तर खवून मिक्सरमध्ये थोडा बारीक करून घ्या.

एका परातीत साबुदाण्याची पूड, शेंगदाण्याची पूड, साखर/गूळ आणि वेलदोडा पूड एकत्र करा.

साजूक तूप गरम करून त्यात काजू-बदाम थोडेसे भाजून घ्या. नंतर हे तूप मिश्रणात घाला.

गरम तूप घालून मिश्रण चांगले मिक्स करा. हात सहन होईल इतके थंड झाल्यावर छोटे लाडू वळा.

'या' टिप्स फॉलो करा 

तूप गरम असतानाच मिश्रणात घालावे, त्यामुळे लाडू छान चिकटतात.

हे लाडू हवाबंद डब्यात 4-5 दिवस सहज टिकतात.

उपवासासाठी गूळ वापरल्यास अधिक आरोग्यदायी आणि पारंपरिक चव येते.

Read More