Marathi News> Lifestyle
Advertisement

Ashadhi Ekadashi 2025: एकादशीला बनवा चटकदार शिंगाड्याच्या पुऱ्या! जाणून घ्या सोपी Recipe

Singhara Puri Recipe in Marathi: पुऱ्या हलक्या, कुरकुरीत आणि उपवासी पदार्थांमध्ये पौष्टिक मानल्या जातात. चला जाणून घेऊयात शिंगाड्याच्या पुऱ्याची सोपी रेसिपी...   

 Ashadhi Ekadashi 2025: एकादशीला बनवा चटकदार शिंगाड्याच्या पुऱ्या! जाणून घ्या सोपी Recipe

How to Make Singhara Puri for Ashadhi Ekadashi Fasting: एकादशी, महाशिवरात्री किंवा कोणताही उपवास असो हलकं, पचनास सोपं आणि पौष्टिक असं काहीतरी खायला मन लागतं. अशा वेळी 'शिंगाड्याच्या पुऱ्या' हा एक उत्तम पर्याय ठरतो. शिंघाड्याच्या पुऱ्या (Singhare ki Puri) या एकादशीच्या उपवासासाठी एक अतिशय लोकप्रिय आणि चविष्ट रेसिपी आहे. शिंगाडा पीठ हे उपवासासाठी परिपूर्ण मानलं जातं. या पुऱ्या अधिकच स्वादिष्ट लागतात. कुरकुरीत, झटपट तयार होणाऱ्या या पुऱ्या हलक्या, कुरकुरीत आणि उपवासी पदार्थांमध्ये पौष्टिक मानल्या जातात. आणि आरोग्यदायी अशा या पुऱ्या उपवासात तुमच्या ताटात नक्कीच हवेच. उद्याच्या आषाडी एकादशी निमित्त तुम्ही आवर्जून चटकदार शिंगाड्याच्या पुऱ्या बनवू शकता. चला जाणून घेऊयात शिंगाड्याच्या पुऱ्याची सोपी रेसिपी... 

लागणारे साहित्य 

शिंघाड्याचे पीठ  – 1 कप

उकडलेले बटाटे – 2 मध्यम आकाराचे

सैंधव मीठ – चवीनुसार

जिरे – ½ टीस्पून

हिरव्या मिरच्या – 1-2 बारीक चिरून (ऐच्छिक)

कोथिंबीर – थोडीशी (उपवासात चालत असल्यास)

लिंबाचा रस – ½ टीस्पून (ऐच्छिक)

तळण्यासाठी तेल/तूप

जाणून घ्या कृती 

बटाट्यांचे कूकरमध्ये 2-3 शिट्ट्या देऊन उकडून घ्या. थंड झाल्यावर त्याची सालं काढा आणि मॅश करून घ्या.

एका परातीत सिंघाडा पीठ, मॅश केलेले बटाटे, सैंधव मीठ, जिरे, आणि इच्छेनुसार हिरव्या मिरच्या आणि लिंबाचा रस टाका.

हे सर्व साहित्य एकत्र करून मऊसर, थोडंसं घट्ट पीठ भिजवा. गरज असल्यास थोडंसं पाणी घालू शकता, पण बटाट्यामुळेच बहुतेक वेळेस पीठ मळतं.

पीठ 10-15 मिनिटं झाकून ठेवा.

आता पिठाचे छोटे गोळे करून त्याच्या लहान पुऱ्या लाटून घ्या. लाटताना ताटलीला थोडं तेल/तूप लावा किंवा प्लास्टिकच्या शीटवर लाटा.

कढईत तेल गरम करून पुऱ्या सोनसळी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूंनी तळा.

गरम गरम पुऱ्या दही, उपवासाची बटाट्याची भाजी किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

'या' टिप्स फॉलो करा 

उपवासानुसार तुम्ही कोथिंबीर किंवा हिरव्या मिरच्या टाळू शकता.

तेलाऐवजी तूप वापरल्यास पुऱ्यांना अप्रतिम स्वाद येतो.

Read More