Marathi News> Lifestyle
Advertisement

दिवसाची सुरुवात करा हेल्दी, नाश्त्यासाठी बनवा झटपट रवा इडली; नोट करा Recipe

Rava Idli Recipe in Marathi: नरम, फुलकं आणि पचायला सोपी अशी रवा इडली तुमच्या पोटालाही समाधान देईल आणि जिभेलाही तृप्त करेल.   

दिवसाची सुरुवात करा हेल्दी, नाश्त्यासाठी बनवा झटपट रवा इडली; नोट करा Recipe

How to make south Indian Rava Idli : दिवसाची सुरुवात हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्टने करायची असेल, तर रवा इडली हा एक परफेक्ट पर्याय आहे. पारंपरिक तांदळाच्या इडलीपेक्षा ही इडली झटपट तयार होते आणि विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतीही आंबवण्याची प्रोसेस करायची गरज नसते.  सकाळ- संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी ही इडली नेहमीच हिट ठरते. नरम, फुलकं आणि पचायला सोपी अशी रवा इडली तुमच्या पोटालाही समाधान देईल आणि जिभेलाही तृप्त करेल.  चला तर मग, घरच्या घरी सहज आणि झटपट तयार होणारी रवा इडली कशी बनवायची ते बघुयात.. 

लागणारे साहित्य

रवा  – 1 कप (मध्यम जाडसर)

दही – ½ कप (ताजं आणि आंबट नसलेलं)

पाणी – अंदाजे ½ कप (गुठळ्या न होईपर्यंत)

इनो फ्रूट सॉल्ट – 1 चमचा (किंवा बेकिंग सोडा ¼ चमचा)

मीठ – चवीनुसार

तेल – 1 चमचा 

तडका (ऐच्छिक):

तेल – 1 चमचा

मोहरी – ½ चमचा

उडीद डाळ – 1 चमचा

कढीपत्ता – काही पाने

हिरवी मिरची – 1 बारीक चिरलेली

किसलेलं गाजर किंवा कोथिंबीर (सजावटीसाठी)

हे ही वाचा: जेवायला काही हलकं खायचं आहे? बनवा गुजराती डाळ-भात, जाणून घ्या Recipe

 

कशी बनवायची राव इडली? 

जर रवा कच्चा वाटत असेल, तर थोडा वेळ कोरड्या कढईत हलकासा भाजून घ्या आणि थंड होऊ द्या.
एका मोठ्या भांड्यात थंड झालेला रवा, दही आणि थोडं पाणी घालून मिक्स करा. हे मिश्रण घट्टसर असावं. 10-15 मिनिटं झाकून ठेवा, जेणेकरून रवा छान फुगेल.
एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, उडीद डाळ, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून परतवा. हे तयार मिश्रण रवा मिश्रणात घालून घ्या. 

हे ही वाचा: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा पोह्याचे कुरकुरीत पकोडे, पावसाची मज्जा होईल द्विगुणित! जाणून घ्या Recipe


शेवटी इनो (किंवा बेकिंग सोडा) घालून लगेच मिक्स करा. मिश्रण थोडं फेसाळेल.
इडली साचा तेलानं हलकासा ग्रीस करून त्यात हे मिश्रण घाला. साचा आधीच गरम केलेल्या इडली कुकरमध्ये ठेवा.
10-12 मिनिटं मध्यम आचेवर वाफवून घ्या. सुरी किंवा टूथपिकने तपासून पाहा. जर टूथपिक कोरडी बाहेर आली तर इडली तयार आहे.
गरमगरम इडली नारळाची चटणी, सांबार किंवा टोमॅटो चटणीसोबत सर्व्ह करा.

हे ही वाचा: थंडगार पावसाळी वातावरणात बनवा स्वादिष्ट वरणफळ! जाणून घ्या मराठमोळी Recipe

 

या टिप्स फॉलो करा 

अजून जास्त टेस्टी इडलीसाठी मिश्रणात थोडं किसलेलं गाजर, काजू किंवा कोथिंबीरही घालू शकता.
दही थोडं आंबट असेल, तर इडली अधिक नरम आणि चविष्ट होते.

Read More