Marathi News> Lifestyle
Advertisement

थंडगार पावसाळ्यात ट्राय करा चटपटीत स्वीट कॉर्न चाट! सोपी आहे Recipe

Masala Corn Recipe: पावसाळ्याच्या थंडगार वातावरणात जर तुम्हाला काहीतरी चटपटीत खायचं असेल तर तुम्ही झटापटीत होणारं स्वीट कॉर्न चाट बनवा.   

थंडगार पावसाळ्यात ट्राय करा चटपटीत स्वीट कॉर्न चाट! सोपी आहे Recipe

How to make sweet corn chaat recipe in marathi:  संध्याकाळच्या चहा वेळेला  काहीतरी झटपट, हेल्दी आणि चवदार खायचं असेल, तर कॉर्न चाट ही एक उत्तम आणि हलकीफुलकी रेसिपी आहे. उकडलेल्या स्वीट कॉर्नसोबत मसाले, लिंबाचा रस, कोथिंबीर आणि थोडं बटर मिक्स केल्यावर तयार होते एकदम झणझणीत आणि लज्जतदार चाट! याची चव  लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. ही रेसिपी फक्त १० मिनिटांत तयार होते आणि अगदी किचनमध्ये फार वेळ घालवायची गरज नाही. हेल्दी पर्याय म्हणूनही ही चाट उत्तम आहे, कारण यात तळलेले काहीच नाही. पार्टी स्नॅक्स, पिकनिक फूड, किड्स टिफिन किंवा सहज खायला काहीतरी हवं असेल, तेव्हाही कॉर्न चाट हा एक परफेक्ट पर्याय आहे. या पावसाळ्यातही हा स्वीट कॉर्न चाट छान लागतो. चला जाणून घेऊयात रेसिपी... 

लागणारे साहित्य

उकडलेला स्वीट कॉर्न – २ कप

बारीक चिरलेला कांदा – १ मध्यम

बारीक चिरलेला टोमॅटो – १ मध्यम

बारीक चिरलेली कोथिंबीर – २ टेबलस्पून

बारीक चिरलेली हिरवी मिरची – १ (ऐच्छिक)

लिंबाचा रस – १ टेबलस्पून

चाट मसाला – १ टीस्पून

काळं मीठ (सेंधव मीठ) – ½ टीस्पून (ऐच्छिक)

मीठ – चवीनुसार

लाल तिखट – ½ टीस्पून (ऐच्छिक)

बटर – १ टीस्पून (हवे असल्यास)

जाणून घ्या कृती 

सर्वप्रथम स्वीट कॉर्न ५–७ मिनिटं पाण्यात उकळून घ्या. (किंवा प्रेशर कुकरमध्ये २ शिट्ट्या देऊन शिजवू शकता.)

एका मोठ्या भांड्यात उकडलेला कॉर्न, चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर एकत्र करा.

त्यात लिंबाचा रस, चाट मसाला, काळं मीठ, मीठ आणि तिखट टाका.

सर्व साहित्य चांगलं एकत्र मिसळा.

हवं असल्यास थोडंसं वितळवलेलं बटर घालून पुन्हा एकदा मिक्स करा.

वरून थोडी कोथिंबीर आणि शेव/पनीर भुरभुरा (ऐच्छिक) आणि लगेच सर्व्ह करा.

'या' टिप्स फॉलो करा 

हवं असल्यास टोमॅटो केचप, मिंट चटणी किंवा तिखट चटणी घालून चव अधिक वाढवू शकता.

ही चाट थंड किंवा गरम  खाल्ली तरी उत्तम लागते.

डायट फॉलो करणाऱ्यांसाठी हे एक हेल्दी, कमी ऑईलचं स्नॅक आहे.

Read More