Marathi News> Lifestyle
Advertisement

विकेंडला बनवा स्ट्रीट स्टाईल खिमा पाव, जाणून घ्या झटपट होणारी Recipe

Kheema Pav Recipe in Marathi: या विकेंडला सकाळी नाश्त्याला किंवा रात्री जेवणाला काही तरी वेगळं खावेसे वाटत असेल तर झटपट होणारी खिमा पावची रेसिपी जाणून घ्या.   

विकेंडला बनवा स्ट्रीट स्टाईल खिमा पाव, जाणून घ्या झटपट होणारी Recipe

How to Make Kheema Pav at Home: खिमा पाव हा मुंबईच्या स्ट्रीट फूडचा एक अतिशय लोकप्रिय आणि स्वादिष्ट प्रकार आहे. मटण किंवा चिकन खिमा खास मसाल्यांमध्ये परतून, तव्यावर बटरमध्ये छान रोस्ट केलेल्या पावांसोबत सर्व्ह केला जातो. झणझणीत खिमा, कुरकुरीत पाव, आणि त्यासोबत लिंबू-कांद्याची साथ आह्ह हे कॉम्बिनेशन खवय्यांची जिभेला वेगळंच सुख देतं. घरच्या घरीही अगदी सोप्या पद्धतीने बनवता येणारा हा खिमा पाव (non veg recipe ) आपल्या विकेंडच्या जेवणासाठी एक उत्तम पर्याय आहे.  चला तर मग, पाहूया ही झणझणीत रेसिपी!

खिमा पावसाठी लागणारे साहित्य (Ingredients):

चिकन/मटण खिमा – 500 ग्रॅम

तेल – 2 टेबलस्पून

कांदा – 2 मध्यम (बारीक चिरलेले)

टोमॅटो – 2 मध्यम (बारीक चिरलेले)

आले-लसूण पेस्ट – 1 टेबलस्पून

हिरव्या मिरच्या – 2 (चिरलेल्या)

हळद – ½ टीस्पून

तिखट – 1 टीस्पून (चवीनुसार)

गरम मसाला – 1 टीस्पून

धने-जिरे पूड – 1 टीस्पून

मीठ – चवीनुसार

पाणी – ½ कप (गरजेनुसार)

लिंबाचा रस – 1 टेबलस्पून

बारीक चिरलेली कोथिंबीर – सजावटीसाठी

पाव – 8 ते 10

बटर  – पाव भाजण्यासाठी

हे ही वाचा: थंडगार पावसाळी वातावरणात बनवा स्वादिष्ट वरणफळ! जाणून घ्या मराठमोळी Recipe

 

कृती (Steps):

गॅसवर कढई गरम करून त्यात तेल टाका. तेल गरम झाल्यावर त्यात चिरलेला कांदा टाकून तो सोनेरी रंग येईपर्यंत परतवा.

कांदा परतल्यावर त्यात आले-लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या टाकून 2-3 मिनिटे परता. नंतर टोमॅटो घालून मिक्स करा आणि टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवा.

आता हळद, तिखट, धने-जिरे पूड आणि मीठ घालून चांगले परता. हा मसाला तेल सुटेपर्यंत परतावा.

नंतर खिमा टाका आणि नीट हलवत 5-7 मिनिटं परता. त्यानंतर ½ कप पाणी टाका (गरजेनुसार) आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर 15-20 मिनिटं शिजवा.

खिमा शिजल्यावर त्यात गरम मसाला आणि लिंबाचा रस टाका. वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करा.

पाव मध्ये कापून त्यावर बटर  लावून गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी थोडे कुरकुरीत होईपर्यंत भाजा.

गरमागरम खिमा एका बाऊलमध्ये घ्या, त्यावर कोथिंबीर आणि लिंबाचा एक तुकडा ठेवा. भाजलेला पाव बाजूला ठेवा. कांदा आणि लिंबाच्या फोडींसह सर्व्ह करा.

हे ही वाचा: Spring Roll: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा स्प्रिंग रोल! जाणून घ्या रेस्टॉरंट-स्टाईल Recipe

 

फॉलो करा 'या' टिप्स 

खिमा आणखी चटकदार हवा  असल्यास थोडासा कसुरी मेथी शेवटी टाकू शकता.

Read More