Marathi News> Lifestyle
Advertisement

ऑनलाईन पेमेंट करताना चुकून दुसऱ्यांच्या खात्यात पैसे गेलेत? 'ह्या' स्टेप्स फॉलो करा आणि परत मिळवा!

UPI Payment Recover Tips: काही वेळा चुकून UPI पेमेंट करताना आपण दुसऱ्यांच्या खात्यात पैसे चुकून पाठवले जातात. असावेळी ते मिळवताना काय करायचं हे जाणून घ्या.   

ऑनलाईन पेमेंट करताना चुकून दुसऱ्यांच्या खात्यात पैसे गेलेत? 'ह्या' स्टेप्स फॉलो करा आणि परत मिळवा!

UPI Payment Tips in Marathi: आजकाल आपण कोणतीही छोटी-मोठी खरेदी केली की पटकन UPI पेमेंट करतो. याशिवाय  कोणालाही पैसे पाठवतानाही आता रोख रक्कम किंवा चेक पेमेंट केलं जात नाही. त्यासाठीही आता UPI पेमेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. झटपट व्यवहार, कुठेही रांग नाही आणि क्षणात पैसे ट्रान्सफर यासगळ्यामुळे UPI व्यवहार लोकप्रिय झाले आहेत. पण कधी कधी घाईगडबडीत चुकीच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर होतात किंवा जास्त रक्कम पाठवली जाते. अशावेळी काय करायचं? पैसे परत मिळणार का? तर आता चिंता करू नका. अशा परिस्थितीतही तुमचे पैसे परत मिळवणं शक्य आहे, फक्त काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. 

पैसे चुकीच्या खात्यात गेले? तात्काळ 'हे' करा 

> तुमच्या बँकेशी त्वरित संपर्क करा-  ज्या बँकेच्या खात्यातून पैसे गेले आहेत, त्या बँकेच्या ब्रँच किंवा कस्टमर केअरशी त्वरित संपर्क साधा.
> ट्रान्झॅक्शनची माहिती द्या-  ट्रान्झॅक्शन आयडी, तारीख आणि वेळ, पाठवलेली रक्कम, चुकून दिलेला खाते क्रमांक ही सगळी माहिती बँकेला द्या. जर बँकेत जाणून हे सगळं करणे शक्य नसल्यास ही माहिती ई-मेलद्वारेही बँकेला कळवू शकता.
> तक्रार क्रमांक मिळवा- बँक तुम्हाला रिक्वेस्ट/तक्रार क्रमांक देईल, ज्याच्या आधारे पुढील प्रक्रिया होईल.
> बँक संबंधित व्यक्तीशी संपर्क करेल – ज्या व्यक्तीच्या खात्यात पैसे गेले आहेत, त्याच्याशी संपर्क साधून परत पाठवण्यासाठी परवानगी मागेल.

जर समोरील व्यक्ती पैसे परत देण्यास नकार देत असेल तर?

> अशा वेळी कायदेशीर कारवाई करता येते.
> संबंधित व्यक्तीने जर पैसे परत केले नाहीत, तर तो RBI च्या नियमांचा भंग करतोय.
> पैसे परत न करणं हे गुन्हा असून, त्यावर शिक्षा होऊ शकते.

UPI व्यवहार करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

> खाते क्रमांक आणि IFSC कोड काळजीपूर्वक तपासा.
> फोन नंबर दोनदा तपासून टाका.
> UPI/IMPS व्यवहार करताना नावाची खात्री करा.
> शक्य असल्यास व्यवहारानंतर स्क्रीनशॉट स्टोअर करून ठेवा.

UPI व्यवहार करताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. पण जर चूक झालीच, तर घाबरू नका. योग्य पद्धतीने तक्रार करून तुमचे पैसे परत मिळवणं शक्य आहे हे लक्षात घ्या. 

Read More