Postpartum Belly Fat : गर्भधारणेनंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. यामध्ये सर्वात स्पष्ट बदल म्हणजे पोटाभोवती वाढलेली चरबी आणि सैल झालेल्या मांसपेशी. बाळंतपणानंतर पोट फुगल्यासारखं दिसू लागतं आणि परत जुन्या अवस्थेत आणणं अनेक महिलांसाठी आव्हानासारखं वाटतं. फक्त पोटाच्या एक्सरसाइज केल्याने काही उपयोग होत नाही. शरीरातीला फॅट कमी करायचा असेल, तर संपूर्ण शरीराला सक्रिय करणाऱ्या कार्डिओ, स्ट्रेंथ आणि कोर एक्सरसाइज आवश्यक असतात. या व्यायामांमुळे केवळ चरबीच कमी होत नाही, तर मांसपेशी टोन होतात, शरीराची पोश्चर सुधारतं आणि आतून ताकद येते.
पाठीवर झोपा, गुडघे वाकवा आणि पाय जमिनीवर ठेवा. पोटाच्या मांसपेशींना आत ओढा आणि कमरेला जमिनीकडे दाबून, पेल्विस थोडसं वर उचला. काही सेकंद थांबा आणि हळूच पुन्हा खाली या. या व्यायामामुळे पोटाच्या खालच्या भागाच्या मांसपेशींना ताकद मिळते आणि पेल्विक एरिया बळकट होतो.
पाठीवर झोपून, गुडघे वाकवा आणि पाय कंबरेच्या रुंदीएवढ्या अंतरावर ठेवा. टाचांनी जमिनीत दाब देऊन, कंबर वर उचला आणि नितंब (ग्लूट्स) घट्ट करा. मग हळूहळू परत खाली या. ही एक्सरसाइज पाठीला, पोटाला आणि नितंबाला बळकटी देते.
जरी साधं वाटत असलं, तरी चालणं हा एक उत्तम कार्डिओ व्यायाम आहे. हे शरीरातील कॅलरी बर्न करतात. मानसिक आरोग्य सुधारतं आणि मेटाबॉलिझम वाढवतं. सुरुवातीला दररोज 20–30 मिनिटं वेगात चालणं खूप फायदेशीर ठरतं.
गुडघे आणि कोपरांवर झुकून, शरीराचा आकार डोक्यापासून गुडघ्यांपर्यंत सरळ रेषेत ठेवा. कोर घट्ट धरून 20–30 सेकंद तसंच रहा. ताकद वाढल्यावर फुल प्लँक करता येईल. हा व्यायाम पोटाच्या आतील मांसपेशी बळकट करतो.
पाठीवर झोपून, गुडघे वाकवा. पोट घट्ट करत एक पायाची टाच जमिनीवर सरकवा आणि परत आणा.त्यानंतर दुसऱ्या पायानेही तेच करा. हे पोटावर जास्त दाब न देता मांसपेशींना अॅक्टिव्ह करतं.
चार हात-पायांवर झोपा. एक हात आणि विरुद्ध पाय सरळ पुढे-पाठीमागे ताणा. पोट घट्ट ठेवून काही सेकंद थांबा. मग दुसऱ्या हात-पायाने तेच करा. या व्यायामामुळे संतुलन वाढतं आणि पाठीच्या व कोरच्या मांसपेशींना ताकद मिळते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)