Acidity Remedy: अनेक लोकांना जेवल्यानंतर पोट फुगणे, अॅसिडीटी आणि छातीत जळजळ किंवा गॅस यासारख्या समस्या निर्माण होतात. यामागे कारण म्हणजे तळलेले पदार्थ, जेवण्यानंतर लगेचच झोपणे किंवा बसून राहणे किंवा अनियिमत जेवण हेच जबाबदार असू शकते. अॅसिडिटी आणि गॅस झाल्यानंतर अनेकजण औषधे घेतात. मात्र तुम्ही घरच्या घरी काही औषधांनीदेखील यावर मात करू शकतात. आम्ही तुम्हाला आज एक जालीम उपाय सांगणार आहेत.
यूएस बोर्ड-प्रमाणित एमडी हेमॅटोलॉजिस्ट-ऑन्कोलॉजिस्ट रवी गुप्ता यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टर स्पष्ट करतात की, तुम्ही अगदी 5-6 सेंकदातच पोटातील गॅस किंवा अॅसिडीटीवर मात करु शकता. त्यासाठी हे काही घरगुती उपाय तुम्ही करू शकता. पोटातील गॅससाठी दिलासा मिळवण्यासाठी बर्फचे थंड पाणी घेऊन काही सेकंद चूळ भरा. तुम्ही ऐकून हैराण व्हाल पण तुमच्या गॅस व अॅसिडीटीवर लगेचच आराम मिळले.
आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की, जेव्हा तुम्ही थंड पाणी काहीवेळासाठी तोंडात भरून ठेवता. तेव्हा वागस नर्व्ह (Vagus Nerve) सक्रीय होते. वागस नर्व्ह हे आपल्या पाचनसंस्थेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. ज्यामुळं पोटातील अॅसिडीटी लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. यामुळं पोटातील अॅसिड न्यूट्रल होण्यास सुरुवात होते आणि छातीत जळजळ, गॅस किंवा अॅसिड रिफ्लक्ससारख्या लक्षणांपासून लगेचच दिलासा मिळतो.
आरोग्यतज्ज्ञांनी ही प्रक्रिया फॉलो करण्यासाठी कमीत कमी 2-3 तास रिकाम्या पोटी राहा. काहीएक खावू नका. त्यामुळं पोटातील अॅसिडीचा स्तर नियंत्रित राहतो. तसंच, पुढच्यावेळी अॅसिडीटी किंवा छातीत जळजळ झाल्याची समस्या उद्भवल्यास तुम्ही हा 5 सेकंदाचा उपाय करु शकता. कोणताही साइड इफेक्ट नाहीत. तसंच यामुळं लगेचच दिलासा मिळतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)