Overthinking Side Effects: लोक अनेकदा अतिविचार करतात. या विचार करण्याच्या सवयीमुळं त्याचा परिणाम आरोग्यावरदेखील होतो. ओव्हरथिकिंग हे एखाद्या आजाराप्रमाणेच आहे. चिंतन करणे चांगली गोष्ट आहे पण प्रमाणापेक्षा जास्त चिंता केल्याने त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. त्याचा परिणाम झोपेवर होतो. ओव्हरथिकिंगमुळं झोप नीट होत नाही. त्यामुळं आज जाणून घेऊया ओव्हरथिकिंगचे लक्षणे आणि त्याचा आरोग्यावर होणार परिणाम. तसंच, ओव्हरथिकिंगपासून स्वतःला कसं रोखावं, याबाबत जाणून घ्या.
- छोट्या छोट्या गोष्टींमुळं व्यक्ती चिंता व्यक्त करतो आणि त्याबाबत विचार करत राहतो. त्यांना सतत प्रश्नांमध्येच अडकत जातात.
- ओव्हरथिकिंगमुळं डोक्यात नकारात्मक विचार येतात. त्यामुळं व्यक्ती मानसिकरित्या खूप थकून जातात. अनेकदा तो व्यक्ती बैचेन असतो.
- ओव्हरथिकिंगमुळं व्यक्ती स्वतःच्या चुकांचा अति विचार करतो आणि अनेकदा जवळच्याच लोकांसोबत वाद घालण्यास सुरुवात करतो.
- ओव्हरथिकिंगमुळं स्लीप सायकल डिस्टर्ब होते. झोप पूर्ण न झाल्यामुळं दिवसभर थकवा राहतो.
- अतिविचार करण्याची सवय मायग्रेन आणि डोकेदुखी होऊ शकते. तसंच, एखादे काम करण्यासाठीचे ध्येय कमी होते.
- स्मरणशक्तीवर परिणाम होतो आणि स्ट्रेसमध्ये राहतो. ओव्हरथिकिंगमुळं पॅनिक अटॅकदेखील येऊ शकतात.
- ओव्हरथिकिंग थांबवण्यासाठी योगासन किंवा मेडिटेशन करायला हवे. स्ट्रेस कमी करण्यासाठी पुरेशी झोप घ्यावी.
- डोक्यात येणारे उलटे-सुलटे विचारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. सतत स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामात बिझी ठेवा.
- जर डोकं शांत ठेवता येत नसेल तर उलटे अंक मोजा. त्यामुळं मन शांत राहतं. ओव्हरथिकिंग करण्याऐवजी कोणासोबततरी तुमचे विचार बोलून दाखवा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)