Marathi News> Lifestyle
Advertisement

नवरा-बायको दोघेही जॉब करणारे असल्यावर घरात आजारी पालकांची काळजी कोण घेणार?

पती-पत्नी दोघेही जॉब करणारे असतील आपल्या मुलांसाठी नॅनी किंवा डे-केअरचा पर्याय निवडतात. पण, घरातले वयस्कर आणि आजारी आई-वडिलांची काळजी कोण घेणार? असा प्रश्न उद्भवतो.

नवरा-बायको दोघेही जॉब करणारे असल्यावर घरात आजारी पालकांची काळजी कोण घेणार?

अनेक कुटुंबात नवरा-बायको दोघेही कामाला जात असल्यामुळे मुलांना सांभाळण्याचा जसा प्रश्न येतो. अगदी तसाच म्हातारे किंवा आजारी आई-वडिल यांची देखभाल कशी करावा? असा देखील प्रश्न उभा राहतो. दोघांनीही नोकरी करण्याची विविध कारणं असू शकतात. काही ठिकाणी याला आर्थिक कारण असतं. तर काही ठिकाणी हा समानता, स्वावलंबन आणि आपल्या क्रिएटिव्हिटीला वाव देण्याचा प्रश्न असतो.

आई-वडिलांना दुसरीकडे पाठवणे हा विचार करणे सुद्धा आपल्या संस्कृतीत नाही. याच कारणामुळे अनेकदा नवरा-बायकोपैकी एकाला आपली नोकरी सोडावी लागते. हे आपलं कर्तव्य आहे यात वाद नाही. यातला सुवर्णमध्य साधण्यासाठी ज्येष्ठांची काळजी घेण्याकरिता एखादी मदतनीस किंवा नर्स घरात ठेवणं सर्वोत्तम पर्याय ठरतो. तरीही, ते सहजासहजी मिळत नाहीत.

पण, इंटरनेटच्या जगात सर्व काही शक्य झालं. इंटरनेटवर अशा बऱ्याच कंपन्या उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक Healthy Wrinkles कंपनी तुमच्या सर्व गरजांची काळजी घेते. घरात काळजी घेण्यासाठी हाउस हेल्प असो, नर्स असो की डॉक्टर सर्व सेवा तुम्हाला घरपोच मिळू शकतात. विशेष म्हणजे, आपल्या आई-वडिलांना आणि आजी-आजोबांना आपण या सुविधा अगदी एक हजार रुपयांपेक्षा कमी दरात रोज देऊ शकतो.

हेल्दी रिंकल्सच्या सुविधा फक्त ठराविक उच्चभ्रू लोकांसाठी आहे असे मुळीच नाही. एखादी व्यक्ती तुमच्या घरात येऊन पूर्ण शिफ्ट करण्यासाठीचा खर्च केवळ 650 रुपयांपासून पुढे आहे. हेल्दी रिंकल्स डॉटकॉमवर याची तपशीलवार माहिती घेता येईल.

केवळ हाऊस हेल्प किंवा नर्सिंगच नव्हे, तर आपल्या घरातल्या ज्येष्ठांच्या आरोग्यापासून सर्व प्रकारच्या सेवा यात उपलब्ध होतील. अशा कंपन्यांची सेवा आपल्याला दरमहासुद्धा घेता येईल. तेही ८००० प्रतिमहा ते १ लाख २० हजार दरमहापर्यंत. प्रत्येक इनकम ग्रुप आणि गरजांचा यात विचार करून सेवा पुरवल्या जातात.

अशी मदत घेतल्यामुळे मुलं देखील पालकांची विशेष काळजी घेऊ शकतात. एवढंच नव्हे तर आई-वडिलसोबत असल्याच समाधान देखील मिळू शकतं.  

Read More