Marathi News> Lifestyle
Advertisement

श्वान गाडीचा पाठलाग का करतात? अशी करा सुटका

Dogs Chasing Bike : श्वान गाडीच्या मागे का धावतात... तुम्हालाही आलाय का हा अनुभव.

श्वान गाडीचा पाठलाग का करतात? अशी करा सुटका

Dogs Chasing Bike : अनेकदा असं होतं की आपण बाईकनं जात असतो किंवा चालत असतो आणि अचानक तुमच्यावर श्वान भुंकू लागतात किंवा मागे लागतात. यावेळी तुम्हाला ही प्रश्न पडतो की असं का? कारण तुम्ही तर काहीही केलेलं नसतं आणि अचानक कोणता श्वान तुमच्यामागे का लागावा? खरंतर हे फक्त तुमच्यासोबत होत नाही तर अनेकदा तुमच्या मित्र किंवा कुटुंबातील अनेक लोकांसोबत होतं आणि ते तुम्हाला येऊन सांगतात. पण नक्की त्यामागे काय कारण आहे की श्वान तुमच्या गाडीच्या मागे लागतात... चला तर आज आपण तेच जाणून घेऊया. 

खरंतर अनेकदा अशा घटना समोर आल्या आहेत की धावत्या गाडीमागे श्वान धावतो आणि तो भुंकत असतो अशावेळी चालकाचा तोल जातो आणि त्याचा अपघात होतो. पण मग कोणताही श्वान हा का म्हणून तुमच्या गाडीच्या मागे किंवा मग तुमच्यामागे काहीही कारण नसताना धावतो. तर त्याचं कारण असं आहे की श्वानाला तो झोपला असेल किंवा शांत बसला असेल तेव्हा त्याच्या बाजून जोरात जाणारी गाडी ही आवडत नाही. त्यातून येणारा आवाजही त्याला त्रास देत असतो. त्यामुळे तो गाडीच्या मागे धावतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्टी म्हणजे आपल्याला कोणत्याही गोष्टीचा जितका आवाज येतो, त्याच्या पाचपट जास्त आवाज हा श्वानांना येतो. 

श्वान तुमच्या गाडीच्या मागे लागले असेल तर काय कराल? 

जर तुम्हाला वाटतंय की रात्री श्वानानं तुमच्या गाडीवर भुंकायला नको किंवा तुमच्यामागे धावायला नको तर, तुम्ही गाडी किंवा मग बाईक ही कमी वेगानं चालवा. जेव्हा एखाद्या गाडीच्या मागे श्वान धावत असेल आणि तुम्हाला चावण्याचा प्रयत्न करत असेल तर घाबरू नका आणि अजून वेगानं गाडी चालवू नका. कारण त्यामुळे तुमचा किंवा मग त्या श्वानाचा अपघात होऊ शकतो. यावेळेस गाडी थांबवून कुत्र्यांना थोडा घाबरवण्याचा प्रयत्न करावा लागतो. यानंतर, हळूहळू दुचाकी पुढे सरकवा आणि तिथून निघून जा. दरम्यान वरील उपाय करून बघा, कदाचित तुमच्या मागे श्वान लागणे बंद होईल. 
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

Read More