Marathi News> Lifestyle
Advertisement

सूर्य देवावरून मुला-मुलींची नावे, बाळ कायम राहील तेजस्वी

Indian Baby Names on Sun :  मुलांना प्रसन्न आणि अतिशय पॉझिटिव्ह नावे ठेवण्याचा विचार करत असाल तर सूर्य देवाच्या नावावरून ठेवायला हरकत नाही. निवडा या नावांवरून तुमच्या मुलासाठी खास नावे 

सूर्य देवावरून मुला-मुलींची नावे, बाळ कायम राहील तेजस्वी

Baby Names on Goddess Sun : घरी तान्ह्युलाचा जन्म झाला की, सगळ्यांची लगबग असते नाव ठेवण्यासाठी. बाळाचं नाव काय ठेवायचं? कसं ठेवायचं आणि कुणी ठेवायचं? यावर जोरदार चर्चा रंगते. रविवार हा सूर्य देवाचा वार समजला जातो. सूर्य देवामध्ये एक वेगळा तेजस्वीपणा आहे. हिंदू धर्मानुसार रविवारी सूर्य देवाची आराधना केली जाते. सूर्य देवामध्ये असलेले तेजस्वी रूप, प्रखरता आणि स्पष्टता देखील या मुलांमध्ये येईल. 

भारतीय संस्कृतीमध्ये मुला-मुलींची देवांवरून नावे ठेवण्याची पद्धत आहे. अनेकजण सूर्याची आराधना करतात. सूर्य देवतेला पूजणाऱ्या लोकांनी खालील नावांवरून आपल्या मुलांकरिता नावे ठेवण्याचा विचार करू शकता. ज्योतिष शास्त्रातही सूर्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे. सूर्यदेवाला असलेला मान-सन्मन, उच्च पद आणि नेतृत्वाची क्षमता यामध्ये असते. 

सूर्यावरून मुलांची नावे

सुयंश सूर्याचा अंश 
सानव सूर्य 
सूर्यांशू   सूर्याची किरणे 
सूर्यांक  सूर्याचा भाग 
सुप्रत  आननंददायी सूर्योदय 
सनिश सूर्य
सौभद्र  अभिमन्यूचे एक नाव 
सरविन प्रेमाची देवता 
सहर  सूर्यप्रकाश 

मुलींची सूर्यावरून नावे 

अरूणिका  उत्साही,   तेजस्वी
एलियाना  सूर्याचे रुप
मालिना   सूर्य देव
सविता  सूर्यासारखी तेजस्वी
सोलब्रित  सूर्य
रश्मी  सूर्याचे नाव
किरण  सूर्याचे किरण
सूर्या मुलीचे नाव

मुलांची नावे 

सन्नी सूर्य
तेसनी सूर्याचे रुप
सूर्या सूर्य
रवी सूर्य
किरण  सूर्याचे किरण
आदित्य  सूर्य 
अन्शुल सूर्याचे रुप
अरूण  सूर्याचे नाव
कायरा  सूर्य
रोशन सूर्यकिरण
इशान  सूर्याचे रुप

सूर्याची संस्कृत नावे 

भास्कर सूर्याचे संस्कृत नाव
अंशुमन  सूर्याचे रुप
आशिर  सूर्य
सवितृ सूर्याचे महत्त्व 
भानु सूर्य
दिवाकर सूर्याचे संस्कृत नाव
दिनकर  सूर्याचे संस्कृत नाव

सूर्य देवाचे धार्मिक महत्त्व 

हिंदू धर्माला सूर्य देवाचे अतिशय महत्त्व आहे. सूर्याला देवतेचे उपाधी दिली आहे. कारण सूर्यदेवता हा एकमेव देव आहे. हिंदू धर्मात सूर्यदेवाची उपासनेला अनन्य साधारण महत्त्व आहे. सूर्योदय झाल्यावर भगवान भास्कराची आराधना केली जाते. या सगळ्या गोष्टींचे महत्तव तुमच्या बाळाला मिळणार आहे.  

Read More