Marathi News> Lifestyle
Advertisement

चंद्रावरुन ठेवा मुलींची नावे, लेकीला मिळेल सुंदर-गोंडस चेहरा

Kojagiri Purnima : कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Poornima 2023) शनिवारी 28 ऑक्टोबर 2023 रोजी साजरी केली जात आहे. चंद्राचा हा सण प्रत्येकजण आनंदाने साजरा करतो. या दिवशी चंद्राच मनमोहक रुप पाहायला मिळतं. तुमच्या मुलाला द्या चंद्रासारखे गोंडस नाव. (Indian Baby Names on Moon)  

चंद्रावरुन ठेवा मुलींची नावे, लेकीला मिळेल सुंदर-गोंडस चेहरा

Indian Baby Names And Meaning : कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच मोहक रुम पाहायला मिळतं. चंद्राची शितलता, शांतता प्रत्येकालाच मोहून टाकत असते. अशीच शितलता आपल्या मुलामध्ये असाी, असं प्रत्येक पालकांना वाटत असतं. अशावेळी तुम्ही चंद्राच्या नावाप्रमाणे किंवा अर्थाप्रमाणे मुलांना नाव देऊ शकता. तुम्हाला मुलींची काही नावे सांगत आहोत ज्याचा अर्थ चंद्र आहे. होय, येथे खूप सुंदर नावे दिली जात आहेत जी तुम्ही तुमच्या मुलीला देऊ शकता.

चंद्राच्या कोरावरुन मुलींची नावे

तुम्ही तुमच्या मुलीसाठी 'अ' ने सुरू होणारी नावे शोधत असाल, तर तुम्ही अधिरा, अरुपा आणि ऑरिमा ही नावे पाहू शकता. अधीरा नावाचा अर्थ चंद्र, वीज आणि बलवान आहे. अरुपा नावाचा अर्थ दैवी, चंद्रमुखी आणि देवी लक्ष्मी देखील या नावाने ओळखली जाते. ऑरिमा कमळाप्रमाणे मऊ आणि चंद्राप्रमाणे तेजस्वी आहे.

मुलीचे नाव

तुम्ही तुमच्या मुलीचे नाव चेरीका देखील ठेवू शकता. चंद्राला चेरीका असेही म्हणतात. याशिवाय फाल्गुनी हे चंद्राशी संबंधित मुलींचे नाव आहे. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवसाला फाल्गुनी म्हणतात. जर तुमच्या मुलीचा जन्म फाल्गुन महिन्यात झाला असेल तर तुम्ही तुमच्या मुलीचे नाव फाल्गुनी ठेवू शकता.

'इ' अक्षरावरुन मुलींची नावे 

इंदू, इंदुबाला आणि इंदुलेखा ही नावेही या यादीत आहेत. जर तुम्हाला पारंपारिक नावे आवडत असतील तर तुम्ही तुमच्या मुलीचे नाव यापैकी एक ठेवू शकता. इंदू नावाचा अर्थ अमृत आहे. चंद्राला इंदुबाला आणि इंदुलेखा असेही म्हणतात.

लेकीसाठी नावे 

जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी सुंदर नावे शोधत असाल तर तुम्ही जान्हवी, ज्योत्स्ना आणि ज्योत्सिका ही नावे देखील पाहू शकता. जाह्नवी म्हणजे चांदणी आणि गंगा नदी. जोत्स्ना म्हणजे अग्नीच्या ज्वाला, चंद्रप्रकाशासारखे तेजस्वी. दुर्गा देवीला ज्योत्स्ना असेही म्हणतात. याशिवाय ज्योत्सिकेला चंद्र असेही म्हणतात.

मुलींकरता नावे 

जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी सुंदर नावे शोधत असाल तर तुम्ही जान्हवी, ज्योत्स्ना आणि ज्योत्सिका ही नावे देखील पाहू शकता. जाह्नवी म्हणजे चांदणी आणि गंगा नदी. जोत्स्ना म्हणजे अग्नीच्या ज्वाला, चंद्रप्रकाशासारखे तेजस्वी. दुर्गा देवीला ज्योत्स्ना असेही म्हणतात. याशिवाय ज्योत्सिकेला चंद्र असेही म्हणतात.

मुलींच्या नावाची यादी 

चंद्राशी संबंधित नावांमध्ये श्रावणी हे नाव देखील आहे. श्रावणी नावाचा अर्थ श्रावण महिन्यातील पौर्णिमेचा दिवस, आकांक्षी, प्रवाह आणि श्रावण महिन्यात जन्म घेतलेला. चंद्राला विधुला देखील म्हणतात आणि तुम्ही तुमच्या मुलीचे नाव विधुला ठेवू शकता. ही दोन्ही नावे खूप गोंडस आहेत आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला ती नक्कीच आवडतील.

Read More