Marathi News> Lifestyle
Advertisement

रात्रीच्या जेवणासाठी बनवा काबुली चना पुलाव, नोट करा Recipe

Recipe in Marathi: नेहमीचेच पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग चना पुलावची रेसिपी नक्की ट्राय करा.   

रात्रीच्या जेवणासाठी बनवा काबुली चना पुलाव, नोट करा Recipe

Chana Pulao Recipe in Marathi: चना पुलाव हा एक स्वादिष्ट आणि पौष्टिक असा भाताचा प्रकार आहे. काबुली चणे, सुगंधी बासमती तांदूळ आणि मसाल्यांचा अप्रतिम संगम यात असतो. चण्यामध्ये प्रोटीन, फायबर आणि खनिजे भरपूर प्रमाणात असल्यामुळे हा पुलाव चवदार तर असतोच पण आरोग्यासाठीही लाभदायक असतो. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. रायता, कोशिंबीर किंवा पापडासोबत याची चव अजून खुलते.

लागणारे साहित्य (४ लोकांसाठी)

बासमती तांदूळ – १ कप

काबुली चणे – १ कप (रात्रभर भिजवून उकडून घ्यावे)

कांदा – २ मध्यम (बारीक चिरलेला)

टोमॅटो – १ मध्यम (बारीक चिरलेला)

आले-लसूण पेस्ट – १ टीस्पून

हिरवी मिरची – २ (चिरून)

तेल किंवा तूप – २ टेबलस्पून

तमालपत्र – १

दालचिनी – १ छोटा तुकडा

लवंगा – ३-४

वेलची – २

जिरे – १ टीस्पून

हळद – ¼ टीस्पून

लाल तिखट – १ टीस्पून

गरम मसाला – ½ टीस्पून

मीठ – चवीनुसार

कोथिंबीर – सजावटीसाठी

पाणी – २ कप

कसे बनवायचा पुलाव? 

प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून २० मिनिटे भिजत ठेवा.

कूकरमध्ये तेल किंवा तूप गरम करून त्यात तमालपत्र, दालचिनी, लवंगा, वेलची आणि जिरे टाका.

त्यात चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परता.

आले-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून एक मिनिट परता.

चिरलेला टोमॅटो, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घालून मसाला चांगला परता.

उकडलेले चणे घालून चांगले मिसळा.

भिजवलेला तांदूळ पाणी काढून मसाल्यात घाला आणि २-३ मिनिटे हलके परता.

२ कप गरम पाणी व मीठ घालून हलक्या हाताने ढवळा.

कूकरचे झाकण लावून २ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा.

वाफ निघाल्यावर पुलाव हलक्या हाताने मोकळा करा आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

'या' टिप्स फॉलो करा 

चणे शिजवताना त्यात थोडे मीठ घातल्यास चव अधिक छान लागते.

हा पुलाव रायता, कोशिंबीर किंवा पापडासोबत अप्रतिम लागतो.

Read More