How To Make layered karanji At Home for Ganeshotsav 2025: करंजी ही महाराष्ट्रातील पारंपरिक सणासुदीची खास मिठाई आहे. नेहमीच प्लेन करंजी बनवली जाते. पण जेव्हा तिच्यात लेयर असतात, तेव्हा ती अधिकच कुरकुरीत लागते. दिवाळी, गणपती किंवा कोणताही सण असो, लेयर्ड करंजी आपल्या टेबलवर लक्ष वेधून घेते. या करंजीचं वैशिष्ट्य म्हणजे तिचे पातळ आणि कुरकुरीत थर ज्यामुळे खायला अत्यंत स्वादिष्ट लागतात. ही रेसिपी थोडी मेहनतीची असली, तरी शेवटी मिळणारा स्वाद नक्कीच त्या कष्टांचं चीज करतो. येणाऱ्या गणपतीसाठी तुम्ही ही करंजी आतच बनवून ठेवू शकता. चला या करंजची रेसिपी जाणून घेऊयात...
कणिकसाठी:
मैदा – २ कप
तूप – २ टेबलस्पून (मोहनसाठी)
मीठ – १ चिमूट
पाणी – लागेल तितके (मळण्यासाठी)
सारणासाठी:
सुके खोबरे किसलेले – १ कप
पिठीसाखर – १ कप
खवा / मावा – १/२ कप
वेलची पूड – १/२ टीस्पून
काजू, बदाम, पिस्ता – आवडीनुसार चिरून
सुकं मनुका – थोडेसे
तूप – १ टीस्पून (खोबरे भाजण्यासाठी)
लेयरसाठी पेस्ट:
तूप – २ टेबलस्पून
कॉर्नफ्लोअर / रवा – २ टेबलस्पून
मैदा, मीठ आणि मोहन (तूप) एकत्र करून त्यात थोडं-थोडं पाणी घालून घट्टसर कणिक मळून घ्या. झाकून ३० मिनिटे ठेवून द्या.
एका पॅनमध्ये १ टीस्पून तूप गरम करून त्यात सुके खोबरे भाजून घ्या.
त्यात मावा टाकून २-३ मिनिटे परतून घ्या.
नंतर गॅस बंद करून त्यात पिठीसाखर, वेलची पूड, काजू-बदाम, मनुका टाकून मिश्रण थंड होऊ द्या.
एका बाउलमध्ये तूप व कॉर्नफ्लोअर एकत्र करून चांगली स्मूथ पेस्ट बनवा.
तयार कणकेचे ५ लहान गोळे करून पोळ्या लाटा.
प्रत्येक पोळीवर थोडीशी लेयरची पेस्ट लावा आणि एकावर एक अशा सर्व पोळ्या ठेवा.
सर्व पोळ्या एकत्र ठेवून त्या एकत्र रोल करून मोठा रोल बनवा.
हा रोल थोडा घट्ट गुंडाळून त्याचे छोटे तुकडे (२ इंच लांबीचे) कापा.
प्रत्येक तुकड्याला उभा ठेवून हलके लाटून छोटे पुरणपोळी आकार तयार करा.
प्रत्येक लाटलेल्या पोळीमध्ये सारण भरा, अर्धवट दुमडून कडा नीट बंद करा.
कडांना करंजी कटरने कापा किंवा काट्याने बंद करा.
कढईत तेल गरम करा.
मध्यम आचेवर करंज्या तळा, जास्त उलथापालथ करू नका.
करंजी सुवर्णपानी व कुरकुरीत होईपर्यंत तळा.
लेयरसाठी पेस्ट गोडसर नको, नाहीतर करंजी फुटण्याची शक्यता असते.
लेयरच्या पोळ्या एकसंध लाटल्याने करंजीत छान कुरकुरीत लेयर्स तयार होतात.
गरम असतानाच डब्यात भरू नका, थोड्या थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात ठेवा.
अशा प्रकारे कुरकुरीत, सुंदर लेयर असलेली करंजी तयार होते. सणासाठी खास करून गणपतीमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांना देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.