Marathi News> Lifestyle
Advertisement

घाईच्या वेळेत झटपट नाश्ता हवा आहे? बनवा ब्रेड रोल, जाणून घ्या सोपी Breakfast Recipe

Bread Roll Breafast Recipe in Marathi: उरलेले ब्रेड वापरण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. यासाठी जास्त साहित्यही लागत नाही.   

घाईच्या वेळेत झटपट नाश्ता हवा आहे? बनवा ब्रेड रोल, जाणून घ्या सोपी Breakfast Recipe

How to Make Bread Roll Recipe in Marathi: सकाळी ऑफिसची घाई, डब्बा बनवणे, आवरणे यात नाश्त्यासाठी काय बनवायचं हे समजत नाही. अशावेळी झटपट तयार होणारा पदार्थ हवा असतो. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी ब्रेड रोल ट्राय करू शकता.  हा पदार्थ इतका सोपा आहे की कुणीही बनवू शकतो. याशिवाय इतका टेस्टी की एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल. उरलेले ब्रेड वापरण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. यासाठी जास्त साहित्यही लागत नाही.  हे रोल तळून खाल्ले तरी टेस्टी  लागतात आणि हवे असल्यास याचं बेक करून किंवा एअर फ्राय करून हेल्दी व्हर्जनही तयार करता येतं.


ब्रेड रोल बनवण्यसाठी लागणारे साहित्य (Ingredients)

स्टफिंगसाठी

बटाटे – 3 मध्यम (उकडून चुरडलेले)

कांदा – 1 मध्यम (बारीक चिरलेला)

हिरव्या मिरच्या – 1-2 (बारीक चिरलेल्या)

हळद – ¼ टीस्पून

जिरे – ½ टीस्पून

मोहरी – ¼ टीस्पून

लाल तिखट – ½ टीस्पून

मीठ – चवीनुसार

कोथिंबीर – 2 टेबलस्पून (बारीक चिरलेली)

लिंबाचा रस – 1 टीस्पून (ऐच्छिक)

हे ही वाचा: सकाळच्या गडबडीत नाश्त्यासाठी बनवा झटपट होणार ब्रेड उपमा, नोट करा Recipe

 

बाहेरील भागासाठी:

ब्रेड स्लाइस – 8 ते 10

पाणी – थोडंसं (ब्रेड भिजवण्यासाठी)

तेल – तळण्यासाठी

कसे बनवायचे रोल्स? 

कढईत थोडं तेल गरम करून त्यात मोहरी व जिरे टाका.

कांदा व हिरव्या मिरच्या घालून परता.

त्यात हळद, तिखट, मीठ आणि  मॅश केलेले बटाटे घालून चांगलं मिक्स करा.

शेवटी कोथिंबीर आणि थोडासा लिंबाचा रस घाला.

स्टफिंग थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

आता ब्रेड स्लाइसचे कडा कापून घ्या. 

हे ही वाचा: डिनरसाठी बनवा रेस्टॉरंट-स्टाईल पनीर बटर मसाला, Recipe आहे सोपी

 

प्रत्येक ब्रेड स्लाइसला थोडंसं पाण्यात भिजवा आणि लगेचच हाताने थोडं दाबून पाणी काढा (फक्त ओलसर करायचं आहे).

ब्रेडवर एक चमचा स्टफिंग ठेवा आणि गोल किंवा लांबट रोलसारखा आकार द्या.

सर्व रोल्स अशाच प्रकारे तयार करून ठेवा.

पुढे कढईत तेल गरम करा.

तयार ब्रेड रोल्स मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा.

किचन पेपरवर काढा जेणेकरून अतिरिक्त तेल शोषले जाईल.

गरमागरम ब्रेड रोल्स हिरव्या चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा. 

हे ही वाचा: Paneer Bhurji: रात्रीच्या जेवणासाठी बनवा झटपट आणि टेस्टी पनीर भुर्जी, नोट करा सोपी Recipe

 

हवे असल्यास हे रोल एअर फ्रायर किंवा बेक करूनही तयार करू शकता.

Read More