Marathi News> Lifestyle
Advertisement

Krunal Pandya : क्रुणाल पंड्या दुसऱ्यांदा झाला बाबा, मुलाला दिलं गोडंस नाव

Krunal Pandya son Name :  कृणाल पंड्याची पत्नी पंखुरी शर्माने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. कृणाल आणि पंखुरी यांनी त्याचे नाव काय ठेवले आहे. जाणून घ्या त्याचा अर्थ

Krunal Pandya : क्रुणाल पंड्या दुसऱ्यांदा झाला बाबा, मुलाला दिलं गोडंस नाव

Vayu Krunal Pandya: लखनऊ सुपर जायंट्सचा अनुभवी खेळाडू कृणाल पंड्या दुसऱ्यांदा वडील झाला आहे. त्यांची पत्नी पंखुरी शर्माने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. कृणाल आणि पंखुरी यांनी त्याचे नाव 'वायू' ठेवले आहे. लखनऊचा खेळाडू क्रुणालने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली. क्रुणालच्या पत्नीने 21 एप्रिलला मुलाला जन्म दिला. मात्र त्यांनी शुक्रवारी ही माहिती सार्वजनिक केली.

कृणालने 2017 मध्ये पंखुरीशी लग्न केले. जुलै 2022 मध्ये पंखुरीने पहिल्या मुलाला जन्म दिला. त्यांच्या मुलाचे नाव कवीर. क्रुणालने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली होती. आता पंखुरीने दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. पंखुरी आणि कृणाल यांनी त्याचे नाव 'वायू' ठेवले आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू क्रुणाल सध्या आयपीएल खेळण्यात व्यस्त आहे. पण त्याने पत्नीसोबतचा ताजा फोटो शेअर केला आहे. 

वायु नावाचा अर्थ 

वायु हे नाव संस्कृत मूळचे मुलाचे नाव आहे. ज्याचा अर्थ "वारा" किंवा "हवा" आहे. वायु हे नाव संस्कृत शब्द "वायु" वरून आले आहे. वायु हे नाव स्वातंत्र्य, चळवळ आणि बदल यांच्याशी संबंधित आहे. सामर्थ्य आणि दृढनिश्चय यांच्याशी देखील संबंधित आहे. वायू हे नाव शास्त्रात खूप चांगले मानले गेले आहे. अभिनेत्री सोनम कपूरच्या मुलाचं नाव देखील वायु असं आहे. 

कृणालच्या मोठ्या मुलाचे नाव 

24 जुलै रोजी कृणाल आणि त्याची पत्नी पंखुरी शर्मा यांना मुलगा झाला. या जोडप्याने आपल्या मुलासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून ही बातमी दिली होती आणि आताही कृणाल आपल्या मुलासोबतचे फोटो पोस्ट करत आहे. कृणाल आणि पंखुरी यांनी त्यांच्या मुलाचे नाव 'कवीर' ठेवले आहे. कवीर नावाचा अर्थ सूर्य, अग्नी, तेजस्वी, प्रकाश आणि तेजस्वी. कृणालच्या मुलाचे नाव केवळ सुंदर नाही तर त्या नावाचा अर्थही खूप सुंदर आहे.

कृणालच्या इंस्टाग्राम पोस्टवर चाहते त्याचे अभिनंदन करत आहेत. या पोस्टला अल्पावधीतच 60 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. विशेष म्हणजे लखनौ सुपर जायंट्सनेही क्रुणालचे अभिनंदन केले आहे. दिनेश कार्तिक आणि शिखर धवनसह अनेक क्रिकेटपटूंनीही कमेंट केली आहे.

क्रुणाल आयपीएल 2024 मध्ये लखनौकडून खेळत आहे. त्याने या मोसमात 8 सामने खेळले असून या कालावधीत त्याने 5 बळी घेतले आहेत. कृणालने 5 डावात 58 धावा केल्या आहेत. या काळात नाबाद 43 धावा ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. कृणालने आयपीएलच्या 121 सामन्यांमध्ये 1572 धावा केल्या आहेत. या कालावधीत एक अर्धशतक झळकावले आहे. त्याच्या आयपीएल कारकिर्दीत त्याने एकूण 75 विकेट्स घेतल्या आहेत.

Read More