How to restaurant style Chicken biryani : सुगंधी मसाले, रसरशीत चिकन आणि बासमती भाताचे थर याचं एकत्रित मिश्रण म्हणजे चिकन बिर्याणी. जेव्हा जेव्हा या डिशचे नाव काढले जाते तेव्हा तेव्हा नॉन व्हेज लव्हर्सची भूक वाढते. बिर्याणी ही प्रत्येक खास क्षणाचा भाग असते,मग तो सण असो, पार्टी असो किंवा रविवारचा कुटुंबासोबतचा जेवण. याच साठी आज आम्ही याची रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी खास मराठी चवीनुसार आणि घरगुती पद्धतीने तयार करण्यात आलेली आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात रेस्टॉरंटसारखी बिर्याणी बनवू शकता. चला तर मग, जाणून घेऊयात चिकन बिर्याणीची सोपी रेसिपी...
चिकन मॅरिनेशनसाठी:
चिकन – 500 ग्रॅम (साफ करून धुतलेले, मध्यम तुकड्यांमध्ये)
दही – ½ कप
आले-लसूण पेस्ट – 1½ टेबलस्पून
तिखट – 1 टेबलस्पून
हळद – ½ टीस्पून
मीठ – चवीनुसार
गरम मसाला – 1 टीस्पून
लिंबाचा रस – 1 टेबलस्पून
कांदा – 1 मध्यम, बारीक चिरून
भातासाठी:
बासमती तांदूळ – 2 कप (30 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावेत)
पाणी – भात शिजवण्यासाठी भरपूर
मीठ – 1 टेबलस्पून
तमालपत्र, दालचिनी, लवंगा, वेलदोडे – थोडे
तेल – 1 टीस्पून (तांदळाला चिकटू नये म्हणून)
मसाल्यासाठी:
कांदे – 3 मध्यम, लांब चिरून परतून घ्यायचे
टोमॅटो – 2 मध्यम, बारीक चिरलेले
पुदिना पाने – 1 कप
कोथिंबीर – ½ कप
गरम मसाला – 1 टीस्पून
बिर्याणी मसाला – 1½ टेबलस्पून (ऐच्छिक)
केशर – 1 टीस्पून (2 टेबलस्पून गरम दुधात भिजवून)
तूप / तेल – 4 टेबलस्पून
एका मोठ्या भांड्यात चिकन, दही, आले-लसूण पेस्ट, तिखट, हळद, मीठ, गरम मसाला, लिंबाचा रस आणि परतलेला कांदा टाका.
नीट मिक्स करून झाकून किमान 1 तासासाठी मॅरिनेट करा (रात्रीभर ठेवल्यास अजून चवदार).
मोठ्या पातेल्यात पाणी उकळा, त्यात मीठ आणि गरम मसाल्याचे पदार्थ (दालचिनी, लवंगा इ.) घाला.
भिजवलेले बासमती तांदूळ टाका आणि 80% शिजेपर्यंत उकळा.
लगेच त्यातलं पाणी गाळून घ्या आणि बाजूला ठेवा.
कढईत तेल/तूप गरम करा. त्यात परतलेले कांदे, टोमॅटो, थोडे पुदिना व कोथिंबीर टाका.
त्यात मॅरिनेट केलेले चिकन टाका आणि 15-20 मिनिटे झाकून मध्यम आचेवर शिजवा.
चिकन शिजल्यावर थोडं कोरडं होईपर्यंत परतत राहा. त्यात गरम मसाला आणि बिर्याणी मसाला घाला.
एका मोठ्या भांड्यात (हँडी/पातेलं), आधी थोडं तूप टाका.
पहिली लेअर चिकन मसाल्याची, नंतर त्यावर थोडे पुदिना-कोथिंबीर आणि केशर दूध घाला
त्यावर अर्धा तांदूळ, पुन्हा चिकन मसाला, पुदिना-कोथिंबीर व तांदूळ घाला.
सर्वात वरून केशर दूध, थोडं तूप आणि परतलेला कांडा घाला.
झाकण घट्ट लावून (किंवा पीठ लावून बंद करा) गॅसवर मंद आचेवर 20-25 मिनिटे दम वर ठेवा.
गॅस बंद करून 10 मिनिटांपर्यंत तसेच ठेवून मगच उघडा.
छान रायत्यासोबत ही चिकन बिर्याणी सर्व्ह करा.