Maha Shivratri Vrat Recipe: महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तगण महादेवाची अराधना करतात आणि व्रतदेखील करतात. या दिवशी संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात शिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी जे लोक व्रत करतात ते फळ व फराळी पदार्थ खाल्ले जातात. तुम्हीदेखील उद्या उपवास करणार असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक नवीन रेसिपी सांगणार आहोत.
तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी कच्च्या केळाचे कटलेट बनवू शकतात. तसंच, हे कटलेट चवीलादेखील चांगले लागतात. त्याचबरोबर पौष्टिक घटक असलेले हे कटलेट दिवसभराची उर्जा देतात. कच्च्या केळ्यांचे कटलेट हे लो कॅलरी स्नॅक्स आहे. जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे कटलेट तुम्ही चटणी किंवा दह्यासोबत खावू शकता. त्याचबरोबर चहा पिता पितादेखील खावू शकता.
साहित्य
3 कच्ची केळी, 2 बटाटे, साबूदाण्याचे पीठ, 2 हिरव्या मिरच्या, लाल मिरची पावडर, 1 चमचा जिरे पावडर, मीठ आणि तळण्यासाठी तेल
कृती
कटलेट बनवण्यासाठी केळी आणि बटाटे उकडून घ्या. नंतर कुकर थंड झाल्यानंतर दोन्ही एका भांड्यात काढून घ्या. थंड झाल्यानंतर बटाटे आणि केळ्यांची सालं काढून घ्या. आणि एका मोठ्या भांड्यात काढून घ्या.
बटाटे आणि केळी एकत्र कुस्करुन घ्या. त्यानंतर यात हिरवी मिरची बारीक कापून टाका नंतर सगळे मसाले टाकून मिश्रण चांगले एकजीव करुन घ्या. त्यानंतर शेवटी साबुदाण्याचे पीठ टाकून चांगले मिक्स करुन घ्या. त्यानंतर टिक्कीसारखा आकार द्या. त्यासाठी हातांना थोडे तेल लावून छोट्या छोट्या आकाराचे कटलेट करुन घ्या.
आता एक नॉन स्टिक पॅन घेऊन त्यात तेल किंवा तूप टाका. नंतर त्यात कटलेट ठेवून दोन्हीकडून सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्या. आता हे कटलेट तुम्ही दही किंवा चटणीसोबत खावू शकता.
तुम्ही उपवासासाठी फराळी पॅटीसदेखील बनवू शकता. हे फराळी पॅटिस कसे बनवायचे याची रेसिपी पाहूयात.
बटाटे, मीठ, मनुका, काजू, दाण्याचा कूट, सुक खोबरं, साखर, हिरव्या मिरचीची पेस्ट, कोथिंबीर, तेल
सगळ्यात आधी उकटलेले बटाटे किसून त्याचा बारीक किस करुन घ्या. आता त्यात चवीनुसार मीठ टाकून मिश्रण चांगले एकजीव करा. त्यानंतर थोडासा किसलेला बटाटा, हिरव्या मिरचीची पेस्ट, मनुका, काजू यांचे काप आणि दाण्याचा कूट, लिंबाचा रस, किसलेले सुकं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर हे एकजीव करुन पॅटीसच्या आतील स्टफिंग करुन घ्या. त्यानंतर हे फराळी पॅटिसचे आवरणाचा गोळा घेऊन त्यात स्टफिंग भरुन घ्या आणि गोलाकार आकार देऊन पॅटिस गरम तेलात तळून घ्या.