गणेशोत्सव, दिवाळी किंवा इतर सणांच्या दिवशी घरातील गृहिणी नव-नवीन गोड पदार्थ तयार करतात. अशावेळी तुम्ही नेहमीपेक्षा वेगळा गोड पदार्थ म्हणून या अनोख्या आकाराच्या चंपाकळ्या तयार करु शकतात. या चंपाकळ्या सगळ्यांना नक्कीच आवडतील. तर जाणून घेऊयात या गोड चंपाकळ्यांची सोपी रेसिपी.
आवश्यक साहित्य:
- 1 वाटी मैदा
- 1 चमचा तूप
- चवीनुसार मीठ
- आवश्यक तितके पाणी
- तळण्यासाठी तेल
पाक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य:
- 1 वाटी साखर
- साखर भिजवण्यासाठी पाणी
कृती:
एका भांड्यात 1 वाटी मैदा घ्या. त्यात तूप आणि मीठ घालून चांगले एकत्र करा.
आता यांनतर त्यात हळूहळू पाणी घालून घट्ट पीठ मळा. पीठ मळून 20-25 मिनिटे झाकून ठेवावे.
काही वेळाने पीठ पुन्हा मळून त्याच्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या. प्रत्येक पाऱ्याच्या मध्ये 6-7 आडवे कट मारून, कडांनी पिरगळून कळ्यांच्या आकार द्या.
या कळ्या तळण्यासाठी तेल गरम करा आणि त्या तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. या कळ्या तळल्यानंतर त्या कुरकुरीत होतात.
हे ही वाचा: घरच्या घरी बनाव ढाबा स्टाईल अमृतसरी पिंडी छोले, जाणून घ्या शाही भाजीची सोपी Recipe
पाक तयार करण्याची कृती:
एका भांड्यात थोडे पाणी उकळा आणि त्यात 1 वाटी साखर घालून एकतारी पाक तयार करुन घ्या.
पाकात केशर, वेलची आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता.
पाक थंड झाल्यावर त्यात तळलेल्या चंपाकळ्या घालून 30 मिनिटे भिजत ठेवा. जितका जास्त वेळ चंपाकळ्या पाकात भिजत राहतील, तितक्या त्या चविष्ट लागतात.
पाकात भिजलेल्या चंपाकळ्यांना एका सुंदर ताटात ठेवा आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवून सर्व्ह करा. या गोड चंपाकळ्या तुमच्या कुटुंबाला आणि पाहुण्यांना नक्कीच आवडतील.