Marathi News> Lifestyle
Advertisement

मार्गशीर्ष महिन्यात जन्मलेल्या लेकीला द्या 'हे' गोंडस नाव, राहील महालक्ष्मीचा आशीर्वाद

Margashirsha Baby Names And Meaning :  मार्गशीर्ष महिना सुरु झालाय. तुम्हाला जर या काळात मुलगी झाली तर तुम्ही खालील नावांचा नक्कीच विचार करु शकता. 

मार्गशीर्ष महिन्यात जन्मलेल्या लेकीला द्या 'हे' गोंडस नाव, राहील महालक्ष्मीचा आशीर्वाद

Baby Girl Names on Lord Lakshmi :  मार्गशीर्ष महिन्यातील आज पहिला गुरुवार. अनेक महिला गुरुवारची मनोभावे पूजा करतात. मार्गशीर्ष महिना हा अतिशय भक्तिमय वातावरणाचा असतो. या वातावरणात मन प्रसन्न असते. या प्रसन्न वातावरणात अधिक प्रसन्न करण्यासाठी तुम्ही मुलीला द्या अतिशय गोड नाव. मुलीचा जन्म झाला की, लेकीला काय नाव ठेवायचं हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर खालील नावांची यादी नक्की पाहा. 

मुलींसाठी लक्ष्मीची नावे 

मुलीला लक्ष्मीचे नाव ठेवल्यास कुटुंबाचे भाग्य उजळते आणि आनंद मिळतो. महत्त्वाचं म्हणजे या नावांना एक रॉयल टच आहे. नवजात बाळासाठी एखादे छानसे नाव देवी लक्ष्मीच्या नावावरुन ठेवू शकता. अतिशय ट्रेंडी ही नावे आहेत. 

मुलींची नावे 

आरना - देवी लक्ष्मीचे एक असामान्य नाव. लाट आणि महासागर असा देखील अर्थ आहे. 

आदि लक्ष्मी - देवी लक्ष्मी श्रीनारायणाच्या पायाची सेवा करताना दिसते. 

अंबजा - कमळाचा जन्म

अनिशा - प्रकाश आणि चमक असा याचा अर्थ आहे. 

भाग्यक्षी - देवी लक्ष्मी, भाग्यवान, 

चंदा - चंद्र 

दीपा - दिवा 

दित्या - प्रार्थनेचे उत्तर, लक्ष्मीचे दुसरे नाव 

देविका - छोटी देवी 

धृती - धैर्य, स्थिरता

दुती - कल्पना, देवी लक्ष्मी 

गौरी - एक सुंदर स्त्री, देवी, पार्वती, 

हरिप्रिया - कृष्णप्रिया 

हिरा - डायमंड

जलधीजा - पाणी , देवी लक्ष्मी 

कांती - कांती हे एक सुंदर संस्कृत नाव आहे ज्याचा अर्थ सौंदर्य आणि कृपा

करुणा - करुण आणि प्रेम 

क्षीरसा - देवी लक्ष्मी 

कुहू - पक्ष्याचे गोड गाणे 

लौक्य - ऐहिक ज्ञानी 

अर्णा - अर्णा या नावाचा अर्थ संस्कृतमध्ये “लहर किंवा महासागर” असा होतो. देवी लक्ष्मी दुधाळ महासागराच्या राजाची कन्या होती. त्यामुळे तिचे नाव अर्णा असे ठेवण्यात येते. 

अनिशा -अनिशा हे नाव दीर्घकाळ टिकणारी ज्योत दर्शवते. हे नाव अहिंसा या शब्दाचे प्रतीकदेखील मानले जाते. अनिशा म्हणजे ‘प्रकाश’ किंवा ‘चमक’. 

ध्वम्सिनी - लक्ष्मी हे श्रीमंतीचे रूप आहे आणि ध्वम्सिनी म्हणजे गरीबी दूर करणारी अशी. हे नाव गरिबी दूर करणाऱ्या व्यक्तीला सूचित करते. ध्वम्सिनी म्हणजे नाश करणारी.

दित्या - "जो सर्व प्रार्थनांचे उत्तर देतो" त्याला देत्य म्हणतात. हे भारतीय वंशाचे हिंदू नाव आहे आणि महालक्ष्मी देवीचे दुसरे नाव आहे. दित्या म्हणजे दाता असाही त्याचा अर्थ होतो.

Read More