हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषेच्या जीआरला ठाकरे बंधूंनी कडाडून विरोध केला. यावेळी मराठी माणसाची ताकद पाहायला मिळाली. यानंतर जीआर रद्द करण्यात आला. यावेळी विजयाचा जल्लोष करण्याकरिता 5 जुलै रोजी वरळी डोम येथे 'विजयी मेळावा' साजरा करण्यात आला. यावेळी राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे यांचे कुटुंबिय देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी ठाकरे कुटुंबाच्या सुनांनी मराठमोळा साज जपला होता.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत यावेळी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. रश्मी ठाकरे आपल्याला कायमच साडीमध्ये दिसतात. रश्मी ठाकरे यांचा पेहराव हा अगदी मराठमोळा होता. ऑफ व्हाईट रंगाच्या साडीला भगव्या रंगाची काठ आहे. सुंदर बाब म्हणजे या साडीचा ब्लाऊज हा पिवळ्या रंगाचा होता. यामुळे अतिशय मोहक अशी ही साडी दिसत होती.
शर्मिला ठाकरे यावेळी जांभळ्या रंगाच्या पैठणी ड्रेसमध्ये दिसला. या ड्रेसला पैठणीचा काट आहे. त्यामुळे त्यातील मराठीपण जपल्याच दिसत आहे. अतिशय साधा असा मेकअप त्यांनी केला आहे. तसेच हातात छोटी पर्स हातात दिसत आहे. तसेच हातात हिरव्या रंगाची बांगडी दिसत आहे. गळ्यात मंगळसूत्र दिसत आहे.
मिताली अमित ठाकरेने देखील यावेळी उपस्थित होती. राज ठाकरे यांच्या अगोदर अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे घराबाहेर पडले. मितालीने यावेळी गुलाबी रंगाचा ड्रेस कॅरी केला होता. 'विजयी मेळावा'च्या वेळी स्टेज गुलाबी रंगाचे होते. अतिशय वेगळा असा हा स्टेज लक्षवेधी ठरला आहे.