Marathi News> Lifestyle
Advertisement

सकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नका 'या' 5 गोष्टी; आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम

Morning Habits : सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात कशी करायची जेणे करून शरीरात आणि मनात एक नवी ऊर्जा राहिल.

सकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नका 'या' 5 गोष्टी; आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम

Morning Habits : सकाळी दिवसाची सुरुवात ही सगळ्यात महत्त्वाची असते. त्यावेळी आपल्या शरीरात आणि मनात एक नवी ऊर्जा असते. त्यामुळे आपली दिवसाची सुरुवात ही एनर्जी आणि पॉजिटिव्हिटीसोबत होते. पण अनेकदा आपण अशा काही सवयी स्वत: ला लावून घेतो की आपल्या आरोग्यावर त्याचा निगेटिव्ह इफेक्ट होऊ शकतो. डॉक्टर इमरान अहमदनं या 5 कामांविषयी सांगितलं की सकाळी उठल्यानंतर त्या करायला नको. 

अंथरुनावर पडून राहू नका

सकाळी अलार्म वाजल्यानंतर लगेच उठायला हवं. अंथरूनात खूप वेळ पडून रहायचं नाही. त्यामुळे शरिराला त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे आळशी होतो. ज्यामुळे दिवसभर दमल्यासारखं वाटतं. यामुळे उठल्यानंतर, एखाद्याने अंथरुणात राहू नये. अंथरुनातून बाहेर पडल्यावर थोडा व्यायाम किंवा स्ट्रेचिंग करावे.

मेडिटेशन करा

सकाळी उठताच काही लोकांना त्यांचा फोन चेक करण्याची सवय असते. खरंतर, ही सवय खूप वाईट आहे. सकाळी जे वातावरण असते आणि शांतता असते त्याकडे लक्ष द्या. मोबाईल वापरू नका. स्क्रीनची ब्लू लाइट डोळ्यांना नुकसान देऊ शकते आणि मानसिक तणाव देखील वाढू शकते. मोबाईल न वापरता काही काळ मेडिटेशन किंवा योगा करा. 

रिकाम्या पोटी चहा आणि कॉफी पिणे

सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी कॉफी किंवा चहा पिणे हे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं. काही न खाता कॉफी प्यायल्यानं पोटात अ‍ॅसिडिटी वाढण्याची शक्यता असते आणि गॅस्ट्रिक समस्या देखील वाढण्याची शक्यता वाढते. त्याशिवाय तुम्ही एक ग्लास गरम पाणी लिंबू टाकून प्या. ते तुमच्या आरोग्यासाठी आणि त्यासोबतच पचनक्रियेच्या सिस्टमला अ‍ॅक्टिव्ह करण्यास मदत करते आणि शरिराला डिटॉक्स करते.

पाणी न पिता दिवसाची सुरुवात
सकाळी उठल्यानंतर शरिर हे हायड्रेट करणं खूप गरजेचं आहे. आपण जेव्हा झोपतो तेव्हा आणि त्यानंतर उठल्यावर या मधल्या काळात शरिरात पाणी नसतं अर्थात पाणी प्यायलेलो नसतो. त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता आहे. सकाळी उठल्यावर पाणी पिल्यानं शरिराला पुन्हा हायड्रेट करता येतं आणि त्यामुळे मेटाबॉलिजम देखील वाढतं. जर तुम्ही पाणी पित नसाल तर त्यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जसं की दमल्यासारखं वाटणं, डोकं दुखी आणि पचनक्रिया मंदावने.

लगेच हेवी ब्रेकफास्ट

सकाळी उठल्या उठल्या हेवी ब्रेकफास्ट करणं आरोग्यासाठी योग्य नाही. त्यामुळे पाचन तंत्रावर परिणाम होऊ शकतो आणि अपचनची समस्या होऊ शकते. सकाळी हल्का आणि पौष्टिक नाश्ता करा. जसे की फळं, लापसी किंवा मग स्प्राउट्स. त्यामुळे तुमच्यात ऊर्जा राहिल आणि तुम्ही दिवसभर अ‍ॅक्टिव्ह रहाल. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Read More