Marathi News> Lifestyle
Advertisement

नागपंचमीदिवशी अगदी सोप्या पद्धतीने बनवा हळदीच्या पानातील पातोळे, पाहा व्हिडीओ

नागपंचमीला पातोळ्या बनवण्याची आणि नैवेद्य दाखवण्याची पारंपरिक पद्धत आहे.

नागपंचमीदिवशी अगदी सोप्या पद्धतीने बनवा हळदीच्या पानातील पातोळे, पाहा व्हिडीओ

नागपंचमीच्या दिवशी आवर्जून प्रत्येक घरात पातोळे केले जातात. थोड्या आणि मोजक्याच जिन्नसमध्ये हा पदार्थ तयार केला जातो. 

नागपंचमी हा श्रावणातील पहिला सण. यानंतर अनेक सण हिंदू संस्कृतीत साजरे केले जातात. नागपंचमी हा सण भावासाठी देखील साजरा केला जातो. या दिवशी नागदेवतेच्या सन्मानार्थ काही जण उपवास करतात. तर काही जण भावाच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. यानिमित्ताने घरात गोडाचा पदार्थ म्हणून कोकणात 'पातोळ्या' हा हळदीच्या पानांचा खास पदार्थ तयार करतात. 

पातोळ्या खाण्याची प्रथा आहे, कारण ती एक पारंपरिक नैवेद्य आहे आणि या दिवशी विशेषतः कोकण भागात ती बनवली जाते. हळदीच्या पानांमध्ये गुळ-खोबऱ्याचं सारण भरून वाफवलेले पातोळे नागाला नैवेद्य म्हणून दाखवले जातात. महत्त्वाच म्हणजे हा पदार्थ नागपंचमीनंतर गणपतीच्या दिवसांमध्येही केला जाऊ शकतो. गणेशोत्सवाच्या काळात नैवेद्य म्हणूनही या पदार्थाचा समावेश करु शकता. 

पातोळ्या बनवण्याची पद्धत:

साहित्य:
तांदळाचे पीठ, नारळ, गूळ, वेलची, हळदीची पाने. 

कृती:
तांदळाच्या पिठात मीठ आणि गरम पाणी घालून पीठ मळून घ्या. 
नारळ आणि गूळ मिक्स करून त्यात वेलची पूड टाका आणि सारण तयार करा.
हळदीच्या पानाला मधून कापून दोन भाग करा आणि त्यावर तांदळाच्या पिठाचा पातळ थर लावा. 
पानावर सारण ठेवून पान दुमडून घ्या आणि कडा बंद करा.
तयार पातोळ्या 10-12 मिनिटे वाफवून घ्या. 

कसा तयार कराल हा पदार्थ

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @circle_of_happiness_2024

नागपंचमीला खास नैवेद्य

नागपंचमीच्या दिवशी वाफवलेले पातोळे नागाला नैवेद्य म्हणून दाखवले जातात. या दिवशी वाफवूनच शिजवलेले पदार्थ खाल्ले जातात. नागपंचमीला पातोळ्या खाण्याचे महत्व अधिक असते. नागपंचमीला नागाची पूजा करून पातोळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो. 

नागपंचमीला पातोळ्या बनवण्याची आणि नैवेद्य दाखवण्याची पारंपरिक पद्धत आहे. तसेच हळदीच्या पानांमध्ये पातोळ्या बनवल्यामुळे त्या आरोग्यासाठी फायद्याच्या असतात. हळद आरोग्यासाठी गुणकारी आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कोकणामध्ये नागपंचमीला पातोळ्या विशेषतः बनवल्या जातात, कारण ती त्यांची पारंपरिक ओळख आहे. 

Read More