महाराष्ट्राचा खाद्यसंस्कृतीही ही कायमच सणवाराप्रमाणे बदलत असते. प्रत्येक सणाचा विशेष असा एक पदार्थ आहे. 'नारळी भात' या पदार्थाची पाहा खास रेसिपी.
श्रावण सुरु झाला की, वेगवेगळ्या सणांची लगबग सुरु होते. नागपंचमीपासून सुरु झालेला हा सण आता नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोपाळकाला आणि त्या पाठोपाठ गणेशोत्सव घेऊन येईल. या सणांच्या दिवसात अनेक पदार्थ तयार केले जातात. त्यातीलच एक पारंपरिक पदार्थ म्हणजे नारळी भात. आज आपण याच पारंपरिक पदार्थाची रेसिपी पाहणार आहोत.
*नारळी भात*
साहित्य
नारळ, सुगंधी तांदूळ, काजू, गूळ, केशर, तूप, वेलची, दालचिनी, लवंग, नारळाचे दूध, वेलची आणि जायफळ
कृती
तूपामध्ये वेलची, दालचिनी, लवंग आणि काजू टाकावेत. यानंतर सुंगधी तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकेवत. यानंतर नारळाचं दूध घालून छान हलक्या हाताने ढवळून घ्यावं. झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे. यानंतर त्यामध्ये नारळाचं दूध, केशर घालून परतून घ्यावे आणि पुन्हा झाकण मारुन ठेवावे. भात शिजल्यावर त्यामध्ये ओलं नारळाचं खोबरं घालावे. भात हलक्या हाताने परतून त्यामध्ये वेलची पावडर, जायफळ किसून घ्यावे आणि चवीसाठी अगदी चिमुटभर मीठ घालावे.