Marathi News> Lifestyle
Advertisement

इंटरनेटवर मुलं कशा मुली शोधतात? निरीक्षणातून समोर आले अनपेक्षित संदर्भ

Social Media Dating Apps : बापरे! इंटरनेटवर विविध डेटिंग अॅप किंवा तत्सम माध्यमातून मुलं कशा पद्धतीच्या मुली शोधतात?PLOS One जर्नलमधून महत्त्वाचा आणि लक्षवेधी तपशील समोर...

इंटरनेटवर मुलं कशा मुली शोधतात? निरीक्षणातून समोर आले अनपेक्षित संदर्भ

Social Media Dating Apps : नातेसंबंध, प्रेम... या साऱ्याच्या पलिकडे जाऊन व्यवहारिकरित्यासुद्धा विचार केला जाणं महत्त्वाचं असल्याची बाब हल्ली अनेकांच्या तोंडी पाहायला मिळते. महिलावर्ग मात्र कायमच जिथं नात्यांचा मुद्दा येतो तेव्हा मनानं विचार करतात असंच अनेकांचं मत. याच मताला छेद दिला आहे तो म्हणजे PLOS One या नियतकालिकामध्ये छापून आलेल्या एका निरीक्षणपर अहवालानं. (Relationship News)

सदर निरीक्षणानुसार पुरूष आणि महिलांचा एकंदर स्वभाव आणि त्यांचा प्राधान्यक्रम पाहता काही अशा गोष्टी समोर आल्या आहेत, ज्यावर विश्वास ठेवणं अनेकांसाठी जवळपास अशक्यच असल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. 

कशा महिलांच्या शोधात असतात पुरूष? 

सदर निरीक्षणपर अहवालासाठी चेक रिपब्लिकमधील एका डेटिंग अॅपमधील जवळपास 3000 हेटेरोसेक्शुअल युजर्सचं विश्लेषण करण्यात आलं. जिथं, संशोधनकर्त्यांच्या एक बाब लक्षात आली की, ज्यांना 'मॅच' अर्थात त्यांना साजेसे साथीदार सापडले त्यापैकी बऱ्याचजणांचा डिझायरेबलिटी स्कोअर एकसारखा होता. गमतीशीर बाब म्हणजे पुरुषांच्या अपेक्षा अनेक असल्या तरीही अखेर त्यांना कोणीही नाकारलं तेव्हा मात्र आपल्याच बरोबरीच्या महिलेला त्यांनी पसंती दिली. 

महिलां इतकं लक्ष का वेधतात? 

निरीक्षणासाठी आधार घेण्यात आलेल्या या डेटिंग अॅपमध्ये पुरुषांची संख्या महिलांपेक्षा जास्त होती, ज्यामुळं महिलांना अधिक स्वाईप (निवड) मिळाले. थोडक्यात डिजिटल डेटिंग वर्ल्डमध्ये महिला तुलनेनं वरचढ ठरल्या. य़ाच निरीक्षणातून आणखी एक बाबसुद्धा समोर आली, ती म्हणजे महिला स्वत:हून कमी महत्त्वाकांक्षी पुरुषांनासुद्धा स्वीकारतात, पुरूषांची ही मानसिकता मात्र काहीशी कमी दिसून येते. 

संशोधनकर्त्यांच्या मते पुरुषांना खरंच एखाद्या नात्याकडे गांभीर्यानं पाहायचं असेल, तर त्यांना अपेक्षांचा स्तर कमी करावाच लागेल. कारण वारंवार नकार मिळाल्यानंतर जी नाती आकारास येतात ती त्याच पुन्हा त्याच स्तरावरील व्यक्तीसोबहत असतात. ज्यामुळं इथं 'हाय रिस्क, हाय रिजेक्शन' फॉर्म्युला निकामी ठरतो. 

हेसुद्धा वाचा : विद्यार्थ्यांसह पालकांसाठी महत्त्वाचं! तिसरी ते दहावीच्या अभ्यासक्रमात बदल; हिंदी सक्तीला ब्रेक?

 

प्रत्यक्षात या निरीक्षणपर अहवालातून सोशल मीडियावर अनेक मतमतांतरं पाहायला मिळालीय अनेकांच्टया मते हे निरीक्षण एका ठराविक ठिकाणाला केंद्रस्थानी ठेवत केल्यानं तेथील आणि इतर ठिकाणच्या नागरिकांची मानसिकता वेगळी आहे हा मुद्दा इथं नाकारता येत नाही. काहींच्या मते एकंदरच डेटिंग अॅप किंवा इंटरनेटवर ज्याप्रमाणं पुरुषांना महत्त्वाकांक्षी महिला भावतात किंवा ते तशाच महिलांच्या शोधात असतात त्याचप्रमाणं महिलांच्याही अनेक अपेक्षा असतात. 

काही नेटकऱ्यांच्या मते मुळात महिलांनीसुद्धा अपेक्षांची यादी कमी करावी, कारण जवळपास 90 टक्के पुरुष अथवा मुलांना डेटिंग अॅपवर Match सापडतच नाही. त्यामुळं बदलता ट्रेंड आणि नात्यांच्य़ा सातत्यानं बदलणाऱ्या या संकल्पनांमध्ये प्राध्यक्रम आणि निकषांमध्येही बदल करणं गरजेचं असल्याचं संशोधनकर्ते सुचवतात. 

Read More