रामनवमी म्हणजेच भगवान श्रीराम यांचा जन्मदिवस. हा दिवस भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी रामाची पूजा करून त्यांना पंजिरीचा प्रसाद अर्पित केला जातो. ही पंजिरी खायला चविष्ट असते, त्याचबरोबर आरोग्यासाठी ही फायदेशीर आहे. रामनवमीच्या दिवशी पंजिरीचा प्रसाद अत्यंत महत्त्वाचा असतो. जर तुम्हाला या दिवशी पंजिरीचा प्रसाद तयार करायचा असेल, तर ही रेसिपी एकदा नक्की पाहा.
साहित्य:
- धने पावडर - 100 ग्रॅम
- शुद्ध देसी तूप - 3 टीस्पून
- साखरेची पावडर - 1/2 कप
- किसलेलं नारळ - 1/2 कप
- मखाने - 1/2 कप
- काजू - 8-10
- बदाम - 8-10
- चिरंजीचे (चारोळी) दाणे - 1 टीस्पून
कृती:
1. पंजिरी बनवण्यासाठी सर्वप्रथम कढई घ्या. त्यात 1 टीस्पून तूप टाका आणि मध्यम आचेवर गरम करा.
2. जेव्हा तूप वितळेल तेव्हा कढईमध्ये धने पावडर टाका आणि गॅस कमी आचेवर ठेवा. 1-2 मिनिटे धने पावडर भाजा.
3. भाजलेले धने पावडर वेगळी काढा.
4. आता पुन्हा कढईत तूप टाका आणि त्यात मखाने घाला. मध्यम आचेवर मखाने भाजून घ्या.
5. मखाने चांगले भाजले की त्याला मिक्सरमध्ये बारीक करा.
6. त्यानंतर काजू आणि बदामाचे तुकडे करुन त्यात घाला.
7. एका वाटीसलेलं किसलेलं नारळ घ्या आणि सर्व मिश्रण एकत्र करा.
9. शेवटी चिरंजीचे दाणे टाका आणि पुन्हा एकत्र करा.
तुम्ही तयार केलेली पंजिरी एका सुंदर वाटी किंवा ताटात सुंदर सजावट करुन भगवान श्रीराम यांना त्याचा नैवैद्य दाखवावा.