मुलांच्या संगोपनात कुटुंबाची भूमिका महत्त्वाची असते पण त्यात पालकांचा वाटा सर्वाधिक असतो. मुलांवर कुटुंबातील इतर सदस्यांचा देखील प्रभाव असतो. जसे की, आजी-आजोबा, भावंड किंवा काकू. ही मंडळी मुलाला चांगल्या गोष्टी शिकवू शकतात आणि त्याला चांगले संस्कार देऊ शकतात, परंतु मुले आपल्या पालकांना पाहून सर्वात जास्त शिकतात.
सद्गुरुंनी त्यांच्या एका प्रवचनात सांगितले आहे की, पालकांनी कधीही त्यांच्या मुलांसमोर दुःखी, रागावलेले किंवा निराश चेहऱ्याने जाऊ नये. त्यांचा चेहरा नेहमी आनंदी आणि प्रेमळ असावा. तुमच्या आयुष्यात तुम्हाला स्वतःला नको असलेल्या गोष्टींचे तुमच्या मुलासाठी उदाहरण मांडू नका. ही सर्वात चांगली गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या मुलासाठी करू शकता.
कसा वेळ घालवता?
तुमच्या मुलासोबत वेळ घालवणे हे पालकांचे कर्तव्य आहे. कारण बाळाला तुमचा वेळ हवा असतो. पालकांनी यासाठी विशेष प्रयत्न करावेत. तुम्ही तुमच्या मुलाला देऊ शकता अशी सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमचा वेळ. यावेळेत मुलासोबत आनंदी आणि सतत हसरं खेळतं वातावरण ठेवा.
नातं घट्ट कसं होईल?
gtscholars मध्ये प्रकाशित लेखानुसार, जर तुम्हाला तुमच्या मुलाला नेहमी आनंदी ठेवायचे असेल तर त्याच्यासोबतच्या तुमच्या नातेसंबंधाचा पाया मजबूत ठेवा. जेव्हा आपण आपल्या मुलाशी संपर्क साधण्यासाठी वेळ काढतो तेव्हा मुलामध्ये विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते. मूल तुमच्याशी बोलायला अजिबात संकोच करत नाही. कारण या ठिकाणी तुमचं मुलं पाहत आहे आणि ते देखील तुमच्याशी तसंच वागणार आहे.
मुलांसमोर वागताना...
सद्गुरुंनी म्हटल्याप्रमाणे, जेव्हा तुम्ही तुमच्या मुलासमोर निराश आणि दुःखी असता तेव्हा तो तुमच्याकडून या गोष्टी शिकेल ज्या तुम्हाला नको आहेत. जर तुम्हाला तुमच्या मुलाला आनंदी ठेवायचे असेल तर आधी त्याच्यासमोर आनंदी राहायला सुरुवात करा.
जादू की छप्पी
इंटर माउंटन हेल्थकेअरच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, मुलांना हावभाव आणि शब्दांतून आपुलकीची गरज असते. मुलाला दिवसातून चार वेळा मिठी मारली पाहिजे. मुलाच्या वाढीसाठी दिवसातून 12 वेळा मिठी मारणे आवश्यक आहे. या नियमाचा अवलंब करून तुम्ही तुमच्या मुलाला आनंदी ठेवू शकता.
सद्गुरु काय सांगतात?
सद्गुरू सांगतात की, जेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात दु:ख असेल किंवा तुम्हाला थोडं एकट राहावसं वाटत असेल, तेव्हा तुम्ही ते तुमच्या मुलासमोर कधीच दाखवू नका. यातून मूलही या गोष्टी शिकेल आणि अनुभवेल. त्यामुळे पालकांनी मुलांसमोर असा चेहरा दाखवणे टाळावे.
मुलांसमोर उदास, थकून-भागून जाताय? बाल मनावर काय परिणाम होतो? सद्गुरु सांगतात...
तुमचं मुल पण तुम्हाला विचारतं,'तुम्ही Sad आहात का?' मुलांच्या या प्रश्नाचा पालकांनी नक्कीच विचार करायला हवा? तुम्हीही निराश किंवा उदास चेहऱ्याने तुमच्या मुलासमोर जात असाल तर सद्गुरुंचा मोलाचा सल्ला वाचा.

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.