Rajmata Jijau Jayanti Speech in Marathi : राजमाता जिजाऊ यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त जन्मच दिला नाही तर त्यांना घडवलं. मंगळवारी 17 जून 2025 रोजी 427 जयंती आहे. या निमित्ताने अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जिजाऊ यांच्यावर भाषण सादर करण्यासाठी 3 सर्वोत्तम नमुने. या निबंधाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या माऊलीने घडवलं त्या जिजाऊंप्रती कृतज्ञता व्यक्त.
स्वराज्य निर्मितीसाठी जिजाऊंनी शिवरायांना प्रेरित केलं. जिजाऊ दांडपट्टा, घोडेस्वारी आणि युध्द कलांमध्ये पारंगत होत्या. लहानपणापासून जिजाऊंनी शिवरायांना थोर पुरुषांच्या कथा सांगितल्या. शिवाजी महाराज युद्ध कलांमध्ये पारंगत व्हावेत यासाठी प्रयत्न केले. महाराज अनेक मोठ्या निर्णयांसाठी जिजाऊंचा सल्ला घ्यायचे . महाराजांनी काही मोहिमा युक्तीने तर काही मोहिमा शक्तीने जिंकल्या. पण या सगळ्यासाठी जिजामाता त्यांना मार्गदर्शन करायच्या. शिवाजी महाराज मोहिमेवर गेल्यावर त्या प्रजेचा सगळा कारभार पाहायच्या. पुण्यावर शाहिस्तेखानाने हल्ला केला. त्यावेळी शिवाजी महाराज मोहिमेवर गेले होते. पण राजमातांनी त्यावेळीही आपले कौशल्य दाखविले. स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या अशा महान राजमातेच्या जीवनामुळे आजही अनेकांना लढण्याचं बळ मिळतं. किल्ले रायगडजवळील पाचाड गावात 17 जून 1674 रोजी जिजाऊंचं निधन झालं. पण मराठी जनांच्या मनात इतिहासातील आठवणींच्या आणि कथांच्या रुपात कायम जिवंत राहतील. या महान माऊलीला जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.
१) राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी लखुजी जाधव यांच्या घरात 12 जानेवारी 1598 रोजी झाला.
२) राजमाता जिजाऊचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.
३) जिजाबाई यांचे पती शहाजीराजे सरदार असल्यामुळे ते सतत मोहिमांवर असल्यामुळे त्यांना मिळालेल्या वतनांची जबादारी संपूर्णपणे राजमाता जिजाऊ यांच्याकडे असायची.
४) पुणे येथील वतनाचा कारभार सांभाळत असताना त्यांनी आपले द्वितीय पुत्र शिवबा यांना संस्कार रुपी पैलू पाडण्याचे काम केले.
५) हिंदवी स्वराज्य निर्माण मराठी मुलखातील सामन्यांना मुघलांच्या जाचातून सोडवले पाहिजे पाहिजे. यासाठी स्वराज्याची स्थापना करावी प्रेरणा त्यांनी शिवाजी महाराजांनी दिली आणि त्यातूनच स्वराज्य उदयास आले.
६ )महाराजांची जडघडण ही जिजाऊंनी केली, त्यांच्या प्रत्येक मोठ्या निर्णयात त्यांचा सहभाग असायचा. अफजलखानाच वध असो किंवा इतर मोहिमा त्यांनी आपल्या युक्तींने महाराजांना नेहमी साथ दिली.
७) राजमाता जिजाऊंच्या धाडसाचे अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. पुण्यावर शाहिस्त खानचा हल्ला झाला तेव्हा शिवाजी महाराज इतर मोहिमांवर असताना राजमातांनी आपले प्रशासकीय कौशल्य दाखविले.
८) इ. स. १६६४ साली दोदिगिरीच्या अरण्यात शहाजी राजांचा अपघात झाला होता आणि ते निवर्तले होते, हा वज्राघात झेलून राजमाता जिजाऊ या स्वतः सती जायला निघाल्या होत्या, पण शिवाजी राजांनी त्यांना विनवणी करून या निश्चयापासून राजमाता जिजाऊंना परावृत्त केले.
९) राजमाता जिजाबाई यांनी महाराष्ट्राच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवलं.
१०) आपल्या मुलाचा अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहण्याचं भाग्य त्यांना लाभलं नाही आणि 17 जून 1674 रोजी किल्ले राजगडजवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले. स्वराजाच्याची प्रेरणा देणाऱ्या अशा महान राजमातेस त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.
राजमाता यांना मानाचा मुजरा करून मी माझे भाषण संपवतो, जय शिवराय, जय जिजाऊ.
राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गावात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, मात्र त्यासाठी त्यांना राजमाता जिजाऊ यांनी प्रेरित केले. राजमाता जिजाऊंनीच त्यांना स्वराज्याची वाट दाखवली. याच प्रेरणेमुळे स्वराज्याचा पाया रचला गेला. राजमाता जिजाऊंच्या संस्कारात शिवाजी महाराजांचे संगोपन झाले आणि यातूनच त्यांना आपल्या दीनदुबळ्या शोषीत कष्टकरी प्रजेसाठी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली.
राजमाता जिजाऊंच्या वडिलांचे नाव लघुजी जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते. राजमाता जिजाऊंना चार भाऊ होते. दत्ताजी, अचलोजी, रघुजी आणि महादुजी असे राजमाता जिजाऊंच्या भावांची नावे होती. राजमाता जिजाऊ दांडपट्टा आणि अश्वारोहण या युद्ध कलांमध्ये पारंगत होत्या. 1605 मध्ये त्यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्यासोबत दौलताबाद येथे झाला. शहाजी राजे निजामशाहीचे सरदार होते. 19 फेब्रुवारी 1630 रोजी राजमाता जिजाऊंनी शिवबांना जन्म दिला.
शिवबांना त्यांनी लहानपणीच रामायण, महाभारताच्या गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज युद्ध कला शिकले. 23 जानेवारी 1664 साली शहाजी राजे यांचे देखील निधन झाले. मात्र, पतीच्या निधनानंतर देखील राजमाता जिजाऊंनी हार मानली नाही. त्या जिद्दीने उभ्या राहिल्या. स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांचे मोठे योगदान होते. छत्रपती शिवाजी महाराजच नाही तर छत्रपती संभाजी महारांजांचे संगोपन देखील जिजाऊंच्या संस्कारातच झाले. 17 जून 1674 रोजी जिजाऊंची प्राणज्योत मावळली.