Marathi News> Lifestyle
Advertisement

वेड्या बहिणीची वेडी ही माया..! बहिण-भावाला द्या या हटके शुभेच्छा

Raksha Bandhan Wishes in Marathi : बहीण भावामधील प्रेम सण म्हणजे रक्षाबंधन... यावर्षी 9 ऑगस्टला रक्षबंधन साजरा करण्यात येणार आहे. आपल्या लाडक्या भावाला आणि बहिणीला पाठवा हे सुंदर आणि मराठी शुभेच्छा मेसेज.

वेड्या बहिणीची वेडी ही माया..! बहिण-भावाला द्या या हटके शुभेच्छा

Raksha Bandhan Wishes in Marathi : वेड्या बहिणीची वेडी ही माया... असं म्हणतं बहिण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधते. भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण 9  ऑगस्टला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. बहिणी आपल्या लाडक्या भावासाठी खास राखीची खरेदी करत आहेत. तर या सणाच्या आपल्या लाडक्या भावाला आणि बहिणीला खास मराठी द्या शुभेच्छा आणि स्टेट्सवर ठेवा हे मेसेज. (Raksha Bandhan Wishes in Marathi Happy Raksha Bandhan Shubhechha Quotes Messages Whatsapp Status Photos Wallpapers)

1. श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे.. भाऊ माझा यशाने न्हाऊ दे.. राखी शिवाय काही नाही माझ्याकडे.. म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे.. हीच आहे माझी इच्छा.. राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

2. रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, बहिण-भावाच्या दृढ नात्याचा हा सण, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

3. हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

4. बंध हा प्रेमाचा,नाव जयाचे राखी... बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती... राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

5. एक धागा, एक विश्वास, हा सण प्रत्येक भावाबहिणीसाठी खास, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

6. थोडी लढणारी, थोडी भांडणारी, थोडी चिडणारी, थोडी काळजी घेणारी, थोडी मस्ती करणारी एक बहीण असते, तीच तर रक्षाबंधन सणाची शान असते.. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

7. भावाबहिणीचं नातं हे वेगळंच असतं, वेळ पडली तर एकमेकांसाठी जीव देतील, पण मागितल्यावर एकमेकांना एक ग्लास पाणीपण देणार नाहीत. म्हणूनच तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

8. राखी बांधून दरवर्षी तू देतोस रक्षणाचे वचन... प्रेमाने राहू आपण अगदी आयुष्यभर... रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

9. कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं, खूप खूप गोड आहे… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!


10. "रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखीत सर्व काही सामावले
बहीण भावाचे प्रेम जगावेगळे
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा"

11. "आई- बहीण- मुलगी सगळी रुप आहेत
तुझ्यात सामावले आहे माझे विश्व
आणि तुझ्यावरच माझा सगळा विश्वास
हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई!!"

12. "बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती..
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती..
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती..
बंधन असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीमगाठी
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा"

13. "ताई तू माझी.. लहान भाऊ मी तुझा..
कायम तूच केलीस माझी रक्षा..
आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा
रक्षाबंधनाच्या भरपूर शुभेच्छा"

14. नाते गुंफले हे रेशमी धाग्याने
वात्सल्य,आपुलकी अन् जिव्हाळ्याने
सदैव टिकावे हे बंध नात्याचे
बहिण-भावाच्या निर्मळ प्रेमाचे
 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

Read More