Marathi News> Lifestyle
Advertisement

अभिनेत्री सई लोकूरने शेअर केलं मुलीचं गोड नाव, जाणून घ्या अर्थ

Unique Baby Girl Names in Marathi: अभिनेत्री सई लोकूरने नुकतंच लेकीचं नाव जाहीर केलं आहे. अतिशय युनिक अशा दोन अक्षरी लेकीचं नाव अतिशय खास असते. 

अभिनेत्री सई लोकूरने शेअर केलं मुलीचं गोड नाव, जाणून घ्या अर्थ

Actress Sai Lokur Daughter Name : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सई लोकूर नुकतीच आई झाली आहे. सई लोकूरने 17 डिसेंबर 2023 रोजी लेकीचा जन्म दिला. आज सईने बाळाचं नाव जाहीर केलं आहे. अतिशय युनिक आणि हटके असं सईच्या लेकीचं नाव आहे. 

 गेल्या अनेक दिवसांपासुन सईचे प्रेग्नंसी फोटोशूट चर्चेत होते. आता नुकतंच सईने सोशल मीडियावर आई झाल्याची गुड न्यूज सर्वांसोबत शेअर केलीय. सईला कन्यारत्न प्राप्त झाले असून आज १७ फेब्रुवारीला सईने मुलीला जन्म दिला. तेव्हा तिने फक्त बाळाच्या जन्माची पोस्ट शेअर केली होती. आज तिने नाव जाहीर केलं आहे. 

सईच्या लेकीचं नाव 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

सईने छान तिघांचा एक गोड फोटो शेअर करत लेकीचं नाव जाहीर केलं. ताशी रॉय (Tashi Roy) सईच्या लेकीचं नाव आहे. ताशी या नावाचा अर्थ अतिशय युनिक आहे. नशीब; शुभता; ख्रिसमसला जन्म, असा युनिक असा या नावाचा अर्थ आहे. ताशीचा जन्म हा 17 डिसेंबरचा असल्यामुळे हे नाव तिला अतिशय साजेसं आहे. 

नुकताच बाळाला एक महिना 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

सई लोकूरच्या लेकीला आज एक महिना झाला आहे. त्या निमित्ताने हे नाव शेअर केलं आहे. आमच्या आनंदाचा गुच्छ, आमची परी, ताशी रॉय....

या निमित्ताने आपण मुलींची इतर युनिक नावे आणि त्याचे अर्थ जाणून घेणार आहोत. 

आभा   प्रकाश
आशा   इच्छा 
अंजू  प्रिय
बेला  वेल
वृंदा   वेल 
भूमि  पृथ्वी
दिशा   दिशा
दया   करुणा
धरा  पृथ्वी 
गीता   हिंदूचा ग्रंथ 
गौरी  पार्वती
ग्रीवा  सुंदरी
गंगा  पवित्र
हर्षा  आनंदी
इशा  पार्वती
जया   दुर्गा मातेचं नाव 
कुंती  पांडवांची माता 
कांता  चमकदार
कृती   क्रिया
लीला   सुंदर
लेखा  रेष
लिपी  वर्णमाला 
मंजू सुंदर
मेघा  पाऊस
निशा रात्र
नेत्रा  डोळे
पूर्वा प्रथम
राधा   राधा
Read More