Marathi News> Lifestyle
Advertisement

मेकअप करताना इतरांसोबत शेअर करताय लिपस्टीक, पावडर? आत्ताच थांबा नाहीतर...

आपल्या सुंदरतेत आणखीन भर घालण्यासाठी सौदर्यप्रसाधने महत्त्वीची भूमिका बजावतात. पण तुम्हाला माहित आहे का? एकमेकांची सौंदर्यप्रसाधनं शेअर केल्याने अनेक गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. या विषयी सविस्तर जाणून घ्या.

मेकअप करताना इतरांसोबत शेअर करताय लिपस्टीक, पावडर? आत्ताच थांबा नाहीतर...

Sharing makeup products is harmsful:  प्रत्येक समारंभानुसार मेकअपचा प्रकार बदलतो. कधी ट्रेडीशनल तर कधी ऑफिसला जाण्यासाठी हलकासा मेकअप प्रत्येकजण करतो. योग्य मेकअप तुमच्या सुंदरतेत भर घालत असतो पण तुम्हाला माहितेय का ? एकमेकांची सौंदर्यप्रसाधनं शेअर केल्याने अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे मेकअप शेअर करणे टाळावे.

मेकअप करताना आपल्या ओळखीतील कोणाशी सौंदर्यप्रसाधनं शेअर केल्याने काय होणार? असाच प्रश्न सहजपणे अनेकांच्या मनात घर करून जातो. पण यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. मेकअप आणि स्किन केअर प्रोडक्ट्स शेअर करण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या.

1. बॅक्टेरियाचा संसर्ग

मेकअप प्रोडक्ट्स शेअर केल्याने चेहऱ्यावर बॅक्टेरिया आणि इतर सूक्ष्मजीवांचा संसर्ग होऊ शकतो. यामुळे पिंपल्स, मुरुमं आणि इतर त्वचाविकार होऊ शकतात.  मस्कारा, आयलायनर यांसारखे डोळ्यांचे मेकअप प्रोडक्ट्स शेअर केल्यास डोळ्यांत संसर्ग होण्याचा धोका वाढतो.  लिपस्टिक किंवा लिप ग्लॉस शेअर केल्याने ओठांवर फोड येणे, जळजळ होणे, साल निघुन ओठ कोरड पडणे आशा अनेक समस्या उद्भवतात. एवढेच नाही तर ओठांचे इन्फेक्शनदेखील होऊ शकते.

2. त्वचेची अ‍ॅलर्जी

प्रत्येक व्यक्तीची त्वचा वेगवेगळी असते. दुसऱ्यांसाठी योग्य प्रोडक्ट्स तुमच्यासाठी अ‍ॅलर्जीचे कारण बनू शकतात. विविध प्रोडक्ट्समधील रसायनांमुळे त्वचेला लालसरपणा, खाज आणि सूज येऊ शकते. त्यामुळे तुमच्या त्वचेसाठी कोणते प्रोडक्ट्स योग्य आहेत ते तपासा आणि त्यानंतर वापरात घ्या.

3. इतर त्वचाविकार

इतरांच्या मेकअप वस्तु वापरल्याने पिग्मेंटेशन होण्याची दाट शक्यता आसते. यामध्ये चुकीचे प्रोडक्ट्स वापरल्यामुळे त्वचेवर काळे डाग येऊ शकतात. याशिवाय तेलकट त्वचेसाठी बनवलेले प्रोडक्ट्स कोरड्या त्वचेसाठी वापरणे त्रासदायक ठरू शकतात.

मेकअप करताना कोणती काळजी घ्याल?

  • फक्त स्वतःचे प्रोडक्ट्स वापरा.
  • प्रोडक्ट्स स्वच्छ ठेवा आणि एक्सपायरी डेट तपासा.
  • त्वचेसंबंधी त्रास असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
  • नेहमी आपल्या त्वचेसाठी योग्य प्रोडक्ट्स निवडा.

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Read More