Eye Care Tips: आपल्याला अनेकदा थकवा जाणवतो मात्र झोप येत नाही, तर बऱ्याचदा आपले शरीर नव्हे तर डोळे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. थकवा हा सहसा विश्रांतीचा अभाव किंवा अतिश्रम यांच्याशी संबंधित असला तरी, एक सामान्य घटक कायम दुर्लक्षित राहतो. हा घटक म्हणजे कोरडे डोळे अर्थात ड्राय आईज्. ज्यावेळी आपले डोळे पुरेसे अश्रू निर्माण करू शकत नाहीत किंवा अश्रूंचे झटपट बाष्पीभवन घडते तेव्हा ड्राय आईज् ही समस्या जन्माला येते. सुरुवातीला ही किरकोळ गैरसोय वाटू शकते. प्रत्यक्षात, याचा तुमच्या दैनंदिन सुखसोयीवर आणि तुम्हाला किती थकवा जाणवतो यावरही मोठा परिणाम होऊ शकतो. कोरडे डोळे अर्थात ड्राय आईज् ही समस्या सामान्य थकव्याच्या आड दडून राहते आणि आपला गैरसमज होतो. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात डॉ. आयुष आय क्लिनिक - चेंबूर येथील डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलचे एक युनिटचे काचबिंदू आणि मोतीबिंदू तज्ज्ञ स्नेहा कंकरिया यांच्याकडून...
डोळ्यांच्या थकव्याबाबत जाणवणारा विरोधाभास म्हणजे तुमच्या डोळ्यांचा पृष्ठभाग एका गुंतागुंतीच्या अश्रूंच्या आवरणाने संरक्षित असतो. ज्यामुळे दृष्टी स्पष्ट आणि आरामदायक राहते. जेव्हा हा समतोल पर्यावरणीय घटक, डिजिटल स्क्रीन पाहत राहणे किंवा ठरावीक काळाने डोळे न मिचकावल्यास डोळ्यांचे स्नायू आणि मज्जातंतूना लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. झोपेची कमतरता नसली तरीही, या अतिरिक्त प्रयत्नामुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो आणि थकवा जाणवू लागतो.
याव्यतिरिक्त, ज्या ऍक्टिव्हिटीमध्ये लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असते - जसे की वाचन किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापर. त्यांच्यामुळे सरासरी डोळे मिचकावण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. कमी प्रमाणात झालेली डोळ्यांची उघड-झाप अश्रूचे वेगाने बाष्पीभवन करतात, डोळे कोरडे होतात आणि अस्वस्थता वाढवतात. कोरडेपणा वाढत असताना, जळजळ, टोचल्यासारखे होणे, कुरकुर आणि अस्पष्ट दृष्टी यासारखी लक्षणे उद्भवू शकतात. ज्यामुळे तुमची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा मंद होऊ शकते.
नियमित विश्रांती घ्याः 20-20-20 नियमाचे पालन करा- दर 20 मिनिटांनी, 20 सेकंदांसाठी 20 फूट दूर पहा. यामुळे डोळ्यांना त्यांची नैसर्गिक आर्द्रता पुनर्प्राप्त करण्याची संधी मिळते.
जाणीवपूर्वक डोळे मिचकावणेः विशेषतः स्क्रीन टाइम असताना, पूर्णपणे आणि वारंवार डोळे उघड-बंद करण्याचा प्रयत्न करा.
वातावरणाला अनुकूल कराः हवेमधील आर्द्रता वाढवण्यासाठी ह्युमिडिफायरचा वापर करा आणि वातानुकूलन, पंखे किंवा धुराचा थेट संपर्क टाळा. त्यांच्या वापरामुळे तुमचे डोळे झटपट कोरडे होऊ शकतात.
लुब्रिकेटिंग आय ड्रॉपचा वापर कराः ओव्हर-द-काउंटर कृत्रिम अश्रू आवरण पुन्हा भरून त्वरित आराम मिळू शकतो. जर या सोप्या उपाययोजनांमुळे आराम मिळत नसेल, तर डोळ्यांच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. सातत्यपूर्ण कोरडेपणा तज्ज्ञांच्या देखरेखीची आवश्यकता अधोरेखित करतो.
लक्षात असू द्या, थकव्याचा संबंध हा नेहमीच झोपेशी नसतो- कधीकधी, तुमच्या डोळ्यांवर जरा अधिक लक्ष देण्याची गरज असते.