Marathi News> Lifestyle
Advertisement

अनुष्का मुलाचा सांभाळ करतेय, तर विराट लेकीला देतोय वेळ...; या सेलिब्रिटी जोडप्याकडून तुम्ही काय शिकावं?

Anushka Sharma- Virat Kohli : लाडक्या वामिकासह विराट गेलाय तरी कुठं? पाहणारे थक्क... पण त्याची ही कृती बरंच सांगून गेली. पाहा त्या खास क्षणांचा फोटो...   

अनुष्का मुलाचा सांभाळ करतेय, तर विराट लेकीला देतोय वेळ...;  या सेलिब्रिटी जोडप्याकडून तुम्ही काय शिकावं?

Anushka Sharma- Virat Kohli : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू अशी ओळख असणाऱ्या विराट कोहली यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नात्यात एका गोड मुलाचा जन्म झाल्याची बातमी जाहीर केली. इतक्या दिवसांपासून अनुष्काच्या गरोदरपणाच्या चर्चांना यामुळं नवा फाटा फुटला. अकाय असं आपल्या मुलाचं आहे, हेसुद्धा अनुष्का आणि विराटनं जाहीर केलं आणि आता या सेलिब्रिटी कुटुंबानं सर्वांच्याच नजरा वळवल्या. 

मुलाच्या जन्मानंतर अनुष्का अद्यापही माध्यमांसमोर आलेली नाही. मुळात, विराटसुद्धा थेट माध्यमांसमोर आला नसला तरीही त्याचे काही फोटो मात्र चर्चेचा विषय ठरत आहेत. महत्त्वाची बाब अशी की, जिथं अनुष्का तिच्या मुलाला म्हणजेच अकायला जास्त वेळ देतेय तिथं आता विराट मात्र त्याच्या लेकीला म्हणजेच वामिकाला पूर्ण वेळ देताना दिसत आहे. 

सोशल मीडियावर वामिका आणि विराटचा एक फोटो व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो एका कॅफेमध्ये बसला असून, वामिकासोबत खास क्षण अनुभवत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरील चर्चा पाहता विराटचा हा फोटो लंडनमधील असून, या फोटोमध्ये वामिकाचा चेहरा मात्र स्पष्ट दिसत नाहीये. हो, पण विराट आणि त्याच्या लेकीचा हा फोटो चाहत्यांचं प्रेम मिळवून जातोय असं म्हणणं गैर ठरणार नाही. 

fallbacks

या सेलिब्रिटी जोडप्याकडून तुम्ही काय शिकावं? 

विराट आणि अनुष्का या सेलिब्रिटी जोडीनं कायमच त्यांच्या प्रत्येक कृतीमधून अनेकांपुढं आदर्श प्रस्थापित केला आहे. यावेळीसुद्धा ही जोडी यास अपवाद ठरली नाहीये. दोन मुलांचं पालतत्वं असणाऱ्या पालकांसाठी दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सुरुवातीचे काही दिवस आव्हानात्मक असतात. पहिल्या मुलाकडे पूर्ण लक्ष देत दुसऱ्या बाळाची काळजी घेण्याचं आवाहन इथं असतं. मुख्य म्हणजे पहिल्या मुलाला एकटेपणा जाणवणार नाही याची काळजी घेतली जाणं आणि नाती अलगद उलगडून सांगणंही इथं तितकंच महत्त्वाचं असतं. विराट आणि अनुष्कानं ही जबाबदारी लिलया पेलल्याचं दिसत आहे. थोडक्यात जिथं अनुष्का अकायची काळजी घेतेय तिथंच विराट लाडक्या लेकीला पूर्ण वेळ देताना दिसतोय, त्यामुळं अनेकांसाठीच हे नियोजन फायद्याचं. 

 

Read More