Health Tips : रात्री झोपमोड होणं ही एक सामान्य समस्या आहे. बऱ्याचदा रात्री अनेकांना टॉयलेट किंवा तहान लागल्यामुळे झोपमोड होते. शिवाय अनेकदा वाईट स्वप्न किंवा झोपताना कुस बदलत असताना सुद्धा जग येऊन झोपमोड होते. मात्र जर रात्री दररोज एकाच वेळी तुमची झोपमोड होत असेल तर या समस्येकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. रोज रात्री 1 ते 3 दरम्यान झोपमोड होऊन पुन्हा झोप न येणे हे आजारांचे लक्षण असू शकते. तेव्हा अशा आजारांबद्दल जाणून घेऊयात.
मायो क्लीनिकनुसार झोपमोड होण्यामागे अनेक कारण असू शकतात. वाढत्या वयामुळे झोपेचे चक्रही बदलते. तसेच काहीवेळा औषधांच्या साईड इफेक्टमुळे सुद्धा झोपमोड होऊ शकते.
दररोज रात्री एकाच वेळी जर तुमची झोपमोड होत असेल तर यामागे ताणतणाव हे सुद्धा एक कारण असू शकते. बराचकाळ तणावाखाली राहिल्यामुळे डिप्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. जर दररोज तुमची झोपमोड होत असेल तर यागोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.
हेही वाचा : Holi Hair Care: बिधास्त खेळा होळी! रंग खेळून झाल्यावर केसांसाठी फक्त 'या' टिप्स फॉलो करा
रात्री गाढ झोपेत असताना अचानक झोपमोड होणं हे लिव्हर संबंधित समस्येचे लक्षण असू शकते. जर दररोज तुमची झोपमोड होत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. जर्नल ऑफ नेचर एंड साइंस ऑफ स्लीपच्या एका रिपोर्टनुसार रात्री अचानकपणे झोपमोड होणं ही लिव्हर खराब होण्याच्या समस्येचे लक्षण असू शकते.
हेही वाचा : लग्नासाठी ट्रेनचा संपूर्ण कोच कसा बुक करायचा? जाणून घ्या सोपी प्रक्रिया, पैसेही वाचतील
रात्री दररोज 2 ते 3 या वेळे दरम्यान जर तुमची झोपमोड होत असेल तुम्हाला फुफुसांसंबंधित समस्या असू शकते. वारंवार झोपमोडल्याने त्रास होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)