Marathi News> Lifestyle
Advertisement

नवीन चवीचं गोड पदार्थ खायचा आहे? बनवा गाजराची खीर, नोट करा Recipe

Carrot Kheer Recipe: तुम्हाला तुमच्या कुटुंबाला काहीतरी नवीन आणि चवदार खायला द्यायचे असेल तर आजच गाजराची खीर बनवा.  

 नवीन चवीचं गोड पदार्थ खायचा आहे? बनवा गाजराची खीर, नोट करा Recipe

How to Make Carrot Kheer: बाजारात मुबलक प्रमाणात गाजर उपलब्ध आहेत. गरमी सुरु झाली असली तरी बाजारात गाजर आहेतच. गाजर सलाड म्हणून तर आपण खातोच. पण त्यापासून अनेक पदार्थी बावटा येतात. यातील जास्त आवडीच्या डिशेश म्हणजे गाजराचा हलवा आणि बर्फी.हे पदार्थ हिवाळ्यात प्रत्येक घरात बनते, पण तुम्ही गाजराची खीर कधी चाखली आहे का? नसल्यास, यावेळी काहीतरी नवीन करून पहा. गाजराची खीर केवळ चवीलाही टेस्टी लागत नाही तर, आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. दूध, गाजर, ड्रायफ्रुट्स आणि केशर यांपासून बनवलेली ही खीर अनेकांना आवडेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते बनवणे खूप सोपे आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबाला काहीतरी नवीन आणि चवदार खायला द्यायचे असेल तर आजच गाजराची खीर बनवा. चला जाणून घेऊया याची सोपी रेसिपी.

लागणारे साहित्य 

  • 2 कप गाजर (किसलेले)
  • 1 लिटर फुल क्रीम दूध
  • ½ कप साखर (चवीनुसार)
  • 2  चमचे तूप
  • ½ कप मावा (खवा) (ऐच्छिक)
  • 8-10 काजू (चिरलेले)

हे ही वाचा: कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबतच मिळतील अनेक फायदे, घरी 'अशी' बनवा कांद्याची चटणी; नोट करा Recipe

 

  • 8-10 बदाम (चिरलेले)
  • ½ टीस्पून वेलची पावडर
  • 8-10 मनुका
  • 4-5  केशर धागे (गरम दुधात भिजवलेले)

हे ही वाचा: Masala Pav Recipe: काही तरी हटके खायचे आहे? बनवा मसाला पाव, झटपट तयार होणारी रेसिपी जाणून घ्या

 

जाणून घ्या कृती 

  • सगळ्यात कढईत तूप गरम करून त्यात किसलेले गाजर टाकून मंद आचेवर ४-५ मिनिटे तळून घ्या, जोपर्यंत ते थोडे मऊ होऊन वास येऊ लागतो.
  • आता एका दोन वेगळ्या पॅनमध्ये दूध गरम करा आणि दूध उकळू लागल्यावर त्यात भाजलेले गाजर घाला. गाजर चांगले नरम होईपर्यंत आणि दूध थोडे घट्ट होईपर्यंत 15-20 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.
  • आता त्यात साखर आणि मावा घालून मिक्स करा. आणखी 5-7 मिनिटे शिजवा, जेणेकरून खीरीला चांगलं टेक्शर येईल.

हे ही वाचा: घरच्या घरी बनवा गूळ-शेवेचे लाडू, एकदा खाल्ल्यानंतर प्रत्येकजण करेल कौतुक; जाणून घ्या Recipe

 

  • आता चिरलेला काजू, वेलची पावडर आणि केशर दूध घाला. ते चांगले मिसळा आणि आणखी 2-3 मिनिटे शिजवा.
  • गॅस बंद करा आणि वर बेदाणे घाला आणि हलके मिक्स करा. तुमची टेस्टी आणि हेल्दी गाजर खीर तयार आहे. 

 

 

Read More