Rainy Season Health Tips : पावसाळा हा ऋतू जेवढा सुखकर आणि आल्हाददायक असतो, काही समस्या आणि आजार घेऊन येतो. पावसाळ्यात संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात पसरतात. पावसाळ्यात लहान मुलांपासून वयोवृद्धांकडे जास्त लक्ष द्यावे लागते. पावसाळ्यातील एक मोठी समस्या असते ती म्हणजे कपडे वाळत नाही आणि ते ओले राहतात. आपल्याकडे अनेक कपडे असतात पण अंतर्वस्त्र हे कमी प्रमाणात असतात. अंतर्वस्त्रशिवाय आपलं काम होऊ शकतं नाही. पण ही ओली अंतर्वस्त्र आपण अनेक वेळा गरम प्रेसने वाळवण्याचा प्रयत्न करतो. पण तरीही त्यात ओलावा राहतो. अशी ओली अंतर्वस्त्र घातने अतिशय धोकादायक असू शकतं. कारण तुम्ही ओली अंतर्वस्त्र घालून गंभीर आजाराला निमंत्रण देत आहात.
केवळ आजारच नाही तर शरीरावर ओली अंर्तवस्त्रे घातल्याने नुकसान पोहोचते. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, ओली अंतर्वस्त्रे घालल्याने UTI होतो. युटीआय म्हणजे मुत्रमार्गाचा संसर्ग आणि या सामान्य पण गंभीर आजारांपैकी मूत्रमार्गाचा संसर्ग जो महिलांना जास्त प्रभावित करतो. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, 50 ते 60 टक्के प्रौढ महिलांना त्यांच्या आयुष्यात किमान एकदा तरी UTI चा त्रास होतो. 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये त्याची शक्यता दुप्पट पाहिल्या गेली आहे.
पावसाळ्यात UTI च्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ होते. याचं एक प्रमुख कारण म्हणजे ओली अंतर्वस्त्र किंवा ओले कपडे घालणे. तज्ज्ञांच्या मते, 'जर एखाद्या व्यक्तीने पावसाळ्यात घट्ट कपडे किंवा ओले अंडरवेअर घातले तर संसर्गाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. हा ओलावा बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यास पोषक ठरतो.'
ओलाव्याच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने जननेंद्रियाजवळ बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ होते. ज्यामुळे पीएच पातळीत असंतुलन होते आणि स्वच्छतेला धोका निर्माण होतो. यामुळे यूटीआय होण्याची शक्यता अनेक पटीने वाढते. विशेषतः जेव्हा एखादी व्यक्ती सिंथेटिक फॅब्रिक घालते, जे हवा जाऊ देत नाही किंवा ओलावा बाहेर पडू देत नाही, तेव्हा समस्या आणखी वाढते.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)