Marathi News> Lifestyle
Advertisement

तुमचा चेहऱ्यावरुन ओळखा तुमच्या आजारांची लक्षणे, कसं ते जाणून घ्या...

Health Tips In Marathi : तुमचा चेहरा अनेक गोष्टी दाखवत असतोय. तुमचा चेहरा तुमच्या संपूर्ण शरीराचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे तुमचे शरीर आजारी असल्यास त्याची लक्षणे तुमच्या चेहऱ्यावर दिसतात. ही लक्षणे कशी ओळखायची जाणून घ्या..

तुमचा चेहऱ्यावरुन ओळखा तुमच्या आजारांची लक्षणे, कसं ते जाणून घ्या...

Your Face Say About Your Health : आपला चेहरा हा मानवी शरीराला आणि संपूर्ण समाजाला एक वेगळी आणि विशेष ओळख देतो. शरीराचा हा एकमेव भाग आहे जो आपण फक्त एकदाच नाही तर अनेकदा पाहतो. जेव्हा एखादी व्यक्ती आजारी किंवा दुःखी असते तेव्हा त्याचा चेहरा खूप थकलेला किंवा उदास दिसतो. पण याउलट जेव्हा जेव्हा तुमच्यासोबत काही चांगलं घडतं तेव्हा तुमचा चेहरा आनंदाने फुलून जातो. चेहरा आणि शरीराच्या प्रत्येक भागातून आनंद स्पष्टपणे दिसतो. चेहऱ्यावरील भाव एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल बरेच काही सांगतात. पण आज आम्ही तुम्हाला चेहऱ्याच्या दिसण्याशी संबंधित अशी अनेक माहिती देणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रकृतीविषयी देखील जाणून घेऊ शकता. म्हणजेच, तुमचा चेहरा सांगतो की तुम्ही आजारी आहेत की नाहीय. 

अनेकदा आजारी असल्याची लक्षणे समान असतात, फक्त आजार भिन्न असतात. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील लक्षणांवरून सांगू शकता की तुम्ही आजारी आहात की नाही. यासाठी तुम्हाला डॉक्टरांना भेटण्याची गरज आहे. चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग, रॅशेस, ब्लॅकहेड्स हे तुमच्या शरीरातील हार्मोनल असंतुलन दर्शवतात. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव एकमेकांशी जोडलेला आहे आणि म्हणूनच आजकाल एक्यूप्रेशर थेरपीद्वारे मोठे आजार बरे होऊ शकतात. मुरुम, डाग, काळेपणा, मुरुम, तेलकट त्वचा, कोंडा आणि इतर ऍलर्जी ही काही प्रकारची लक्षणे आहेत. याद्वारे आपल्याला किडनी, फुफ्फुसे, शरीरातील विषारी, मेंदूचे विकार, छातीत जळजळ, शरीरातील साखरेचे प्रमाण वाढणे, कोलेस्टेरॉल, युरिक ऍसिड आदी समस्यांची माहिती मिळते व त्यावर उपायही सांगितले जातात.

कपाळ

कपाळावर येणारे पिंपल्स हे किडनीच्या समस्येचे लक्षण आहे. तसेच कपाळ लालसरपणा हे अतिमद्यपान, चहा, कॉफी, पेये यांचे लक्षण आहे. पांढरे डाग जास्त प्रमाणात दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने होतात. कपाळाच्या मध्यभागी लालसरपणा जास्त साखर खाल्ल्याने किंवा तणावामुळे होतो. डोक्याच्या मागील बाजूस मुरुम दिसणे हे अतिरिक्त ताण, रक्ताभिसरणाची कमतरता आणि अपुरी झोप हे लक्षण आहे. याव्यतिरिक्त, केसांमध्ये रसायने किंवा तेलाचा जास्त वापर केल्याने केसांवर पोमेड मुरुम तयार होतात.

नाक

भुवयाच्यामध्ये दोन उभ्या रेषा असतील तर लिव्हरमध्ये फॅट आणि कफचे प्रमाण वाढल्याचे लक्षण आहे. तुमचे नाक शरीराच्या नसा, रक्तवाहिन्या आणि हृदयाशी जोडलेले आहे. नाकावर मोठे पिंपल्स असणे हे हृदय आणि रक्तातील अशुद्धतेचे लक्षण आहे. यासोबतच चहा, कॉफी, अल्कोहोल आणि गुटखा यांचे अतिसेवन केल्याने मुरुम दिसू लागतात. नाक लाल होणे आणि सूज येणे ही मूत्रपिंड आणि यकृताच्या समस्यांची लक्षणे आहेत.

डोळे

डोळ्याखाली काळे डाग पडणे किंवा डोळे लाल होणे किंवा डोळ्यांना सूज येणे ही यकृताच्या समस्यांची लक्षणे आहेत. याशिवाय असंतुलित आहारामुळे डोळ्यांवरील त्वचा सूजते.

कान

किडनीमध्ये समस्या असल्यास कानावर मोठे पींपल्य येतात. त्यासोबत कान लाल होतो. 

ओठ

जर ओठ लाल किंवा गुलाबी असतील तर याचा अर्थ मूत्रपिंड चांगले काम करत आहेत.किडनीचा त्रास असेल तर ओठ काळे पडणे, कोरडे पडणे किंवा आजूबाजूला खाज सुटणे हीच लक्षणे दिसतात.

गाल

गालावर मुरुम दिसणे हे पल्मोनरी डिसऑर्डर, रक्ताभिसरण समस्या आणि पचनक्रियेतील अडथळे यांचे लक्षण आहे. याशिवाय गाल पातळ होणे हे शरीरातील प्रथिनांच्या कमतरतेचे लक्षण आहे. स्त्रियांमध्ये गालावर बारीक केस येतात. ती प्रजनन प्रणालीतील व्यत्ययाची लक्षणे आहेत.

Read More