Marathi News> Lifestyle
Advertisement

प्लास्टिकच्या स्टूलला छिद्र का असतं? फक्त सजावटीसाठी नाही तर...99% लोकांना उत्तर माहिती नाही!

प्रत्येक घरात एक तरी प्लास्टिकचा स्टूल असतोच. पण या स्टूलला मध्यभागी एक छिद्र असतो. याचा उपाय काय असतो याचा प्रश्न तुम्हाला पडलाय?

प्लास्टिकच्या स्टूलला छिद्र का असतं? फक्त सजावटीसाठी नाही तर...99% लोकांना उत्तर माहिती नाही!

Interesting Facts in Marathi : प्लास्टिकच्या वस्तू हे प्रत्येक घरातील एक अविभाज्य अंग आहे. प्लास्टिकच्या वस्तू या वजनाने फारच हकल्या आणि स्वस्त असतात. त्यामुळे प्लास्टिकच्या वस्तूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या प्लास्टिक वस्तूमधील एक वस्तू म्हणजे स्टूल. जो प्रत्येक घरात आपल्याला दिसतोच. वेगवेगळ्या रंगांमध्ये विविध आकाराचा स्टूल हा दिसायला आकर्षक तर असतोच आणि तो वर्षानुवर्षे टिकतो. लहानसहान कामासाठी स्टूलचा वापर केला जातो. या प्लास्टिक स्टूलला कधी निखून पाहिलंय का? या प्लास्टिकच्या स्टूलच्या मध्यभागी एक छोटा आकाराचा एक गोल छिद्र असतो. स्टूलला असलेले हे छिद्र सजावटीसाठी नाही तर एक महत्त्वाचा कामासाठी असतं. त्याबद्दल 99 टक्के लोकांना त्याबद्दल माहिती नसतं. (Why do plastic stools have holes Not just for decoration Interesting Facts in Marathi)

तुम्हाला कधी प्लास्टिकच्या स्टूलला छिद्र का असतो, असा प्रश्न पडलाय का? आज आपण याच बद्दल जाणून घेणार आहोत. बरंच लोक असा दावा करतात की, या छिद्रातून गॅस जाण्यास मदत मिळते. म्हणूनच वैद्यकीय क्षेत्रात विष्ठेलाही स्टूल म्हणतात आणि या प्लास्टिकच्या टेबलला स्टूल देखील म्हणतात, ही एक गंमतीशीर बाब आहे. 

प्लास्टिकच्या स्टूलला छिद्र का असतं?

या लेखातून आपण या प्लास्टिक स्टूलला असलेल्या छिद्र का असतं याबद्दल जाणून घेणार आहोत. या प्लास्टिक छिद्र बनवण्यामागे तीन मुख्य कारणं असतात. पहिलं कारण म्हणजे या छिद्रातून स्टूलची ताकद वाढते. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोल आकाराचे छिद्र स्टूलच्या वरच्या बाजूला असतं. जे कधीही चौरस, त्रिकोण किंवा इतर कोणत्याही आकाराचे नसतात. यामागील कारणही तेवढंच महत्त्वाचं आहे. तज्ज्ञ सांगतात की, जेव्हा एखादी व्यक्ती या स्टूलवर बसते तेव्हा त्याचे वजन या छिद्रावर पडतो. तो त्याचे वजन स्टूलच्या चार पायांवर समान प्रमाणात वितरीत करतो. त्यामुळे बसलेला भाग तुटत नाही. हा भाग इतर कोणत्याही आकाराचा असता तर त्याच्या कोपऱ्यांवर म्हणजे कोनावर दाब पडला असता आणि तिथूनच टेबल तुटूला असता. 

त्यासोबतच एकावर एक स्टूल ठेवल्यास हवेचा दाब वाढतो. ज्यामुळे स्टूल एकमेकांना चिकटण्याची शक्यता वाढते. एअर प्रेशर आणि वॅक्यूममुळे ते चिकटतात. जे सहसा लवकर निघत नाही. स्टूलवर छिद्र असल्याने ते एकमेकांना चिटकत नाही. ते लवकर वेगळे होतात.

बोटाने उचलण्यासाठी छिद्र उपयुक्त आहे

त्याशिवाय घरात किंवा दुकानात जागेच्या अडचणीमुळे हे स्टूल एकमेकांना ठेवले जातात. अशावेळी हे स्टूल वेगवेगळे करण्यासाठी स्टूलला असलेल्या छिद्रामुळे ते वेगळे करणे सोपे जातात. पण इथे अभियंत्यांची एक गोष्ट कौतुकास्पद आहे. जर छिद्र मोठे केलं तर स्टूल लवकर फुटतो, जर तो खूप लहान केला तर त्यात बोट प्रवेश करणार नाही, यामुळे छिद्राचा आकार देखील काळजीपूर्वक बनवण्यात आलाय. 

Read More