Marathi News> Lifestyle
Advertisement

प्रेमात पडल्यावर खरंच झोप उडते का? काय आहे शास्त्रीय कारण

प्रेम हे त्या व्यक्तीला पूर्णपणे वेड लावून जातं. या प्रेमात आकंठ बुडालेला माणूस आपली झोपही हरवून बसतो. पण खरंच प्रेमात पडल्यावर झोप उडते का? शरीरात नेमके काय बदल होतात. रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर. 

प्रेमात पडल्यावर खरंच झोप उडते का? काय आहे शास्त्रीय कारण

जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात पडते तेव्हा त्याची झोप आणि मनःस्थिती पूर्णपणे बिघडून जाते. ना त्या व्यक्तीला भूक लागत ना त्याला कोणत्याही गोष्टीचं भान राहत नाही. प्रेमात पडलेली व्यक्ती पूर्णपणे प्रेमाच्या आणि त्या व्यक्तीच्या विचारात असते. अनेक मोठी मंडळी याना प्रेमात वेडं होणं असं म्हणतात. पण तुम्हाला माहित आहे का? की प्रेमात पडलेल्या व्यक्तीची झोप का उडते? काय आहे यामागचं खरं आणि शास्त्रीय कारण?

प्रेम या शब्दांचा अमल ड्रग्स-दारु यापेक्षाही जास्त 

प्रेमाचा परिणाम शरीरावर अगदी दारू किंवा ड्रग्सप्रमाणे होत असते. अनेकदा तर ही दारू देखील प्रेमासमोर फिकी पडते. या प्रेमाची देखील लत लागते. अमेरिकेतील न्यू जर्सी येथील रटगर्स युनिव्हर्सिटीच्या संशोधनात प्रेम आणि ड्रग-अल्कोहोल व्यसन यांच्यातील संबंध दिसून आला आहे. संशोधनानुसार, जेव्हा कोणी ड्रग्स किंवा अल्कोहोल घेते तेव्हा त्याच्या रक्तात डोपामाइन, ऑक्सीटोसिन, ॲड्रेनालिन आणि व्हॅसोप्रेसिन सारखी अनेक रसायने बाहेर पडू लागतात, ज्यामुळे शरीरात एक वेगळाच आनंद जाणवतो. या शोधात तो पुन्हा दारुच्या शोधात राहते आणि हळूहळू व्यसनाधीन होतो.

प्रेमात झोप का उडते?

एखाद्याला तहान लागल्यावरही ते मेंदूमध्ये डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन सोडते. शरीर आणि मन त्याचा आनंद घेतात. हे पुन्हा अनुभवण्यासाठी तो त्याच्या प्रेमाच्या म्हणजेच जोडीदाराजवळ राहतो, त्या व्यक्तीला मिस करतो आणि फोनवर सतत बोलण्याचा प्रयत्न करतो. हळूहळू माणसाला त्याचे व्यसन लागते. प्रेमाच्या या नशेत शरीरात अतिरिक्त ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे अतिक्रियाशीलता जाणवते आणि झोप निघून जाते.

प्रेमात जास्त झोप कुणाची उडते, मुले की मुली?

'बिहेवियरल स्लीप मेडिसिन'मधील संशोधनात असे दिसून आले आहे की, झोपेवर प्रेमाचा प्रभाव लिंगानुसार बदलतो. प्रेमात असलेल्या मुलींच्या झोपेवर मुलांपेक्षा जास्त परिणाम होतो. बऱ्याच प्रकरणांमध्ये, हा प्रभाव दुप्पट देखील असू शकतो. असंही होऊ शकतं की, ब्रेकअप झाल्यावर मुलगी रात्रभर जागे राहते आणि मुलगा पाय पसरून आरामात झोपतो. याचे कारण म्हणजे मुलींचे भावनिक होणे आणि त्यांचे हार्मोनल असंतुलन याचा परिणाम झोपेवर होतो. 

प्रेमात आकंठ बुडून जातात

जर प्रेम नवीन असेल तर ते रात्रभर जागे राहण्यास भाग पाडते परंतु जेव्हा प्रेम जुने किंवा त्याचे नात्यात रुपांतर झाले असेल तर त्याची तीव्रता कमी होते.  'युनिव्हर्सिटी ऑफ तुर्किये'मध्ये 600 जोडप्यांवर केलेल्या संशोधनात असे आढळून आले की, जर प्रेमळ जोडीदार असेल तर झोपेची गुणवत्ता खूपच चांगली होते. हे अगदी आई आणि मुलाच्या प्रेमासारखे आहे.

ज्याप्रमाणे आपल्या आईजवळ झोपलेल्या मुलाला सुरक्षित वाटते, तिने त्याच्या डोक्याला हात लावला किंवा थोपटले की लगेच झोपायला लागते, अशीच भावना प्रेमळ जोडीदाराच्या बाबतीत घडते. मग त्याचा जोडीदार सुरक्षित, आरामशीर वाटते आणि गाढ झोप लागते.

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Read More