Marathi News> Lifestyle
Advertisement

चुकूनही कुणाला बोलू नका 'हॅप्पी गुड फ्रायडे', आजच्या दिवशी काय झालंय ते जाणून घ्या

ख्रिश्चन धर्मात का साजरा केला जातो 'गुड फ्रायडे'. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय?

चुकूनही कुणाला बोलू नका 'हॅप्पी गुड फ्रायडे', आजच्या दिवशी काय झालंय ते जाणून घ्या

Good Friday History in Marathi: गुड फ्रायडेच्या दिवशी, ख्रिस्ती धर्माचे अनुयायी येशू ख्रिस्ताचे स्मरण करण्यासाठी चर्चमध्ये जातात. आज 29 मार्च म्हणजेच 'गुड फ्रायडे'. 'गुड फ्रायडे' हा पवित्र शुक्रवार म्हणून साजरा केला जातो. गुड फ्रायडेला होली फ्रायडे, ब्लॅक फ्रायडे आणि ग्रेट फ्रायडे म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी येशू ख्रिस्त यांना वधस्तंभावर चढवण्यात आलं. 

ख्रिश्चनांच्या श्रद्धेनुसार, या दिवशी येशू ख्रिस्ताने संपूर्ण जगातून वाईटाचा नायनाट करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. ख्रिश्चन गुड फ्रायडेचा दिवस मोठ्या शोकाने स्मरण करतात आणि उपवास देखील करतात. तसेच या दिवशी लोक चर्चमध्ये जातात आणि येशू ख्रिस्ताचे स्मरण करतात. त्याच वेळी, काही ठिकाणी, येशू ख्रिस्ताचे बलिदान आणि त्याचे शेवटचे शब्द गुड फ्रायडेच्या दिवशी विशेष कार्यक्रम म्हणून चित्रित केले आहेत. त्यामुळे ख्रिश्चन या दिवशी उपवास करतात तर काही लोक मांसाहार करत नाहीत. 

गुड फ्रायडेला ब्लॅक फ्रायडे आणि ग्रेट फ्रायडे म्हणूनही ओळखले जाते. आज 29 मार्च रोजी गुड फ्रायडे साजरा केला जात आहे. त्याच वेळी, इस्टर संडे 31 मार्च रोजी साजरा केला जातो. इंग्रजी कॅलेंडरनुसार दरवर्षी गुडफ्रायडे वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. 

गुड फ्रायडेचा इतिहास 

ज्यू लोकांमध्ये येशू ख्रिस्ताची वाढती लोकप्रियता तिथल्या दांभिक धर्मगुरूंना खटकू लागली तेव्हा त्यांनी येशूबद्दल रोमन शासक पिलाताकडे तक्रार केली. त्यांनी पिलातला सांगितले की, देवाचा पुत्र असल्याचा दावा करणारा हा तरुण केवळ पापीच नाही तर देवाच्या राज्याविषयीही बोलतो. तक्रार आल्यानंतर येशूवर धर्माचा अपमान केल्यासोबत राजद्रोहाचा आरोप करण्यात आला. 

यानंतर येशूला सुळावर चढवून मृत्यूदंड देण्याचा आदेश जारी करण्यात आला.फटके मारल्यानंतर आणि काटेरी मुकुट घातल्यानंतर, प्रभु येशूला वधस्तंभावर खिळ मारले गेले. ज्या ठिकाणी  वधस्तंभावर खिळले होते त्या ठिकाणाचे नाव गोलगोथा आहे. बायबलनुसार, शुक्रवारी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर चढवण्यात आले होते, म्हणूनच त्याला गुड फ्रायडे असे म्हणतात. 

का म्हटलं जातं गुड फ्रायडे 

गुड फ्रायडेला गुड फ्रायडे म्हटले जात असले तरी हा दिवस आनंदाचा नसून शोकाचा दिवस आहे. म्हणूनच तुम्ही कोणालाही शुभेच्छुक शुक्रवार म्हणू नये. कारण याच दिवशी येशू यांना सुळावर चढवले होते. 

ख्रिस्ती अनुयायांचा असा विश्वास आहे की, या दिवशी येशू ख्रिस्ताने स्वतःचे बलिदान देऊन मानवतेचे उत्थान केले. ख्रिश्चनांसाठी हा त्याग आणि प्रेमाचा दिवस मानला जातो.गुड फ्रायडे हा पवित्रता किंवा चांगुलपणाचा दिवस देखील मानला जातो, म्हणून त्याला 'होली फ्रायडे' देखील म्हणतात. काही लोकांचा असाही विश्वास आहे की, गुड फ्रायडेमधील गुडचा अर्थ हा गॉड म्हणजे परमेश्वर आहे. 

गुड फ्रायडेच्या दिवशी ख्रिश्चन समाजातील लोक मांसाहार वर्ज्य करतात. त्यांचा असा विश्वास आहे की गुड फ्रायडेच्या दिवशी येशू ख्रिस्ताने मानवतेसाठी आपले जीवन बलिदान दिले.

Read More