Kanda Navami 2025 : हिंदू पंचांगानुसार आषाढी एकादशीपूर्वी आणि चातुर्मास सुरु होण्यापूर्वी खास नवमी साजरी केली जाते. या नवमीला कांदे नवमी मानली जाते. यादिवशी घरोघरी कांद्याचे विविध पदार्थ केले जातात. पावसाळा असल्याने सर्वात आवडता आणि प्रसिद्ध पदार्थ म्हणजे कांद्या भजी...त्यासोबत यादिवशी कांदे पोहे, कांद्याचा झुणका, झणझणीत कांदा थालीपीठ, कांद्याच्या पिठपेरलेल्या भाज्या करण्यात करण्यात येतात. असं मान्यता आहे की, कांदे नवमीनंतर कांदा चार महिन्यांसाठी वर्ज्य असतो. त्यामुळे कांदे नवमीला मोठ्या प्रमाणात कांद्याचे पदार्थ केले जातात. या प्रथेमागे धार्मिक शास्त्रात महत्त्व आहे शिवाय यामागे वैज्ञानिक कारणही आहे.
हिंदू धर्मात धार्मिक शुभ कार्यात देवाला नैवेद्य दाखवताना त्या पदार्थांमध्ये कांदा लसूण वापरण्यावर वर्ज्य असतो. धर्मशास्त्रात असं मान्यता आहे की, देवाच्या नैवेद्यात कांदा लसूण असल्यास देव नाराज होतात. आषाढी एकादशीपासून पुढील चार महिने चातुर्मास सुरु होतो. पुढील चार महिने व्रत सण असतात. अशात कांदा लसूण खालला जात नाही.
त्यामुळे या नवमी तिथीला कांदा नवमी म्हटलं जातं. तरदुसरीकडे अशा वेळी घरात कांदे भरून ठेवले तर पावसाळी वातावरणात ते कुजून खराब होतात आणि घरात दुर्गंध पसरते. म्हणून नवमी तिथीला कांदाचे पदार्थ केले जातात. जेणेकरुन घरातील कांदा संपून जाईल.
धार्मिक कारणाशिवाय कांदे नवमीमागे वैज्ञानिक कारणही आहे. कांदाला कोंब फुटल्यास असा कांदा खाल्ल्यास मनोव्यापार चाळवणारा ठरतो. म्हणून कांद्याला कंदर्प म्हणजे मदन असं म्हटल जातं. कांद्याचे सेवन केल्यास त्याचा परिणाम रक्तात असेपर्यंत कामवासनात्मक विचार मनात येतात असं तज्ज्ञ सांगतात. कांदा खाल्ल्यावर काही वेळाने वीर्याची घनता कमी होते आणि गतीमानता वाढते. त्या शिवाय पावसाळ्यात कांदा खाल्ल्यास अपचन, अजीर्णसारखे उदरविकार होतात. त्यामुळे नवमी तिथीनंतर कांदा खाऊ नये असं सांगण्यात आलंय.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)