Marathi News> Lifestyle
Advertisement

Kitchen Tips: मळलेले पीठ फ्रीजमध्ये का ठेवू नये? जाणून घ्या महत्त्वपूर्ण कारण

why kneaded dough is bad in fridge: वेळ वाचवण्यासाठी अनेकदा एकदाच पीठ मळून कणिक फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवतात. पण हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतं. कसं ते जाणून घेऊयात.   

Kitchen Tips: मळलेले पीठ फ्रीजमध्ये का ठेवू नये? जाणून घ्या महत्त्वपूर्ण कारण

Why kneaded dough is bad in fridge: बहुतेक घरांमध्ये स्वयंपाकात वेळ वाचवण्यासाठी पीठ मळून आधीच तयार करून ते थेट फ्रिजमध्ये ठेवले जाते. सकाळच्या घाईच्या वेळेत महिला वर्गाला घाईच्या वेळी काम सोपं व्हावं म्हणून असं केलं जातं. ही पद्धत सर्रास सगळ्याच घरात वापरली जाते.  पण, तुम्हाला हे माहित आहे का की फ्रिजमध्ये ठेवलेलं मळलेला  पीठ आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतं. फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणिकेचे नक्की काय होते? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो ते जाणून घेऊयात. 

येतो आंबटपणा

मळलेलं पीठ जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यामध्ये आंबटपणा तयार होतो. याचे कारण असे की पाण्यामुळे पीठात सूक्ष्मजैविक क्रिया सुरू होतात. या प्रक्रियेमुळे पीठ हळूहळू आंबू लागतं. काही वेळानंतर त्यामध्ये बॅक्टेरिया आणि फंगस तयार होण्याची शक्यता वाढते. अशा पिठाचा उपयोग केल्यास अपचन, अ‍ॅसिडिटी, पोटदुखी, उलट्या व अन्न विषबाधा यासारख्या शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात.

हे ही वाचा: रात्रीच्या जेवणासाठी बनवा चविष्ट आणि झटपट अशी स्पेशल 'पनीर मखनी', नोट करा Dinner Recipe

 

पोषणमूल्यांमध्ये घट 

फ्रिजमधील थंड तापमानामुळे जरी मळलेलं पीठ जास्त काळ टिकवता येत असले, तरी त्याच्या पोषणमूल्यांमध्ये घट होते. विशेषतः त्याच्यामधील व्हिटॅमिन्स आणि एंजाइम्स नष्ट होतात. त्यातच जर ते पीठ स्टोअर करताना प्लास्टिकच्या डबा किंवा प्लॅस्टिकची पिशवी वापरली तर ते चांगलं ठरत.  कारण यामुळे त्यातून रासायनिक पदार्थ देखील अन्नामध्ये मिसळू शकतात, जे दीर्घकालीन आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकतात.

हे ही वाचा: नाश्त्याला नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? बनवा फ्युजन स्टाईल चीज मसाला घावन, नोट करा Recipe

तज्ज्ञांच्या मते.... 

तज्ज्ञांच्या मते, मळलेलं पीठ अर्थात कणिक फ्रीजमध्ये 6-8 तासांपेक्षा अधिक ठेवू नये. शक्यतो जेवणाच्या आधीच ते ताजं गूंथावं आणि लगेच वापरावं. ही सवय तुमचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यास मदत करेल. लक्षात घ्या वेळ वाचवण्याच्या घाईत आरोग्यावर तडजोड करू नका. 

हे ही वाचा: Recipe: नाश्त्यासाठी बनवा रवा-पोह्यांची सॉफ्ट आणि हेल्दी इडली, झटपट तयार होईल Healthy Breakfast

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे.झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Read More